सरस्वती मालिकेत सरस्वतीच्या जीवाला धोका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 16:24 IST2017-03-10T09:15:00+5:302017-03-10T16:24:46+5:30
सरस्वती या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक नवीन वळण मिळणार आहे. सरू आणि राघव दुबईला फिरायले गेले असल्याचे आपल्याला या ...

सरस्वती मालिकेत सरस्वतीच्या जीवाला धोका?
स स्वती या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक नवीन वळण मिळणार आहे. सरू आणि राघव दुबईला फिरायले गेले असल्याचे आपल्याला या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. निळाशार समुद्र, वाळू आणि लखलखती दुबई याध्ये सरस्वती आणि राघवचे प्रेम फुलणार आहे. लग्नानंतर सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर गेले असून ही ट्रीप त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. सरस्वती ही एका छोट्याशा गावामध्ये राहणारी मुलगी असल्याने ती परदेशात फिरायला जायला खूप उत्सुक आहे.
दुबई ट्रीपमध्ये सरस्वती प्रेक्षकांना एका वेगळ्या लुकमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. सरस्वती पहिल्यांदाच विमानामध्ये बसणार असल्याने याबाबत तिच्या मनात खूपच उत्सुकता आहे. विमानतळावर जाताना वा विमानमधून प्रवास करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टी करू नये हे सगळेच तिच्यासाठी खूपच नवीन असल्याकारणाने तिची चांगलीच धांदल उडणार आहे. तसेच प्रेक्षकांना विमानामधील एक ड्रीम सिक्वेन्सदेखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये सरस्वती आणि राघवने एक रोमँटिक डान्स केला आहे. तसेच दुबईला जाताना सरस्वती नवऱ्यासाठी लोणची, चटण्या, चिवडा अशा बऱ्याच गोष्टी घेऊन गेली आहे. यावरूनच तिचे आपल्या नवऱ्यावरचे प्रेम कळून येत आहे.
सरू आणि राघवने अनेक अविस्मरणीय क्षण दुबईमध्ये एकमेकांसोबत घालवले. दोघेही दुबईमधील निळाशार समुद्र, वाळवंट आणि वाळूमध्ये खेळले. प्रेमाचे मोलाचे क्षण एकत्र घालवले, त्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच दोघांनी दुबईचा फेरफटका तर मारलाच पण त्याबरोबर राघवने सरस्वतीला खूप खरेदीदेखील करून दिली. दुबईमध्ये ते दोघे खूप फिरलेदेखील. पण त्याचदरम्यान राघव आणि सरस्वतीची चुकामुक झाली. पण इतक्या मोठ्या शहरात सरस्वतीने राघवला शोधून काढले हे महत्वाचे. तसेच सरस्वतीला खुश ठेवण्याचा तसेच आपले तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. राघवने सरस्वतीसाठी एक सुंदर रोमँटिक गाणेदेखील गायले. पण याच ट्रीपमध्ये सदाशिव सतत त्या दोघांचा पाठलाग करत होता. तो सरस्वतीला मारण्याच्या हेतूने दुबईला गेला आहे. त्यामुळे सरस्वतीचा जीव धोक्यात आहे. आता सरस्वतीचे काय होते हे बघणे रंजक ठरणार आहे.