सरस्वती मालिका रंजक वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 13:36 IST2017-06-01T08:06:48+5:302017-06-01T13:36:48+5:30
सरस्वती या मालिकेत आता नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेमध्ये बऱ्याच वेळानंतर सरस्वतीचे मोठे मालक म्हणेच राघव परतणार आहे. ...

सरस्वती मालिका रंजक वळणावर
स स्वती या मालिकेत आता नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेमध्ये बऱ्याच वेळानंतर सरस्वतीचे मोठे मालक म्हणेच राघव परतणार आहे. राघव आणि सरस्वती काही दिवसांपूर्वीच दुबईची वारी करून आले. दोघांनीही दुबईमध्ये खूप छान क्षण देखील घालवले परंतु दोघांच्याही नशिबात काही वेगळेच लिहिले होते. याच वारी दरम्यान सरस्वतीने तिच्या मोठ्या मालकांना गमावले आणि हे कटू सत्य पचवणे सरस्वतीसाठी खूपच कठीण होते. पण, तिला कुठेतरी विश्वास आहे कि तिचे मोठे मालक परतणार, आणि तसच काहीस घडणार आहे. सरस्वतीच्या आयुष्यात पुन्हा मोठे मालक म्हणजेच राघव परतणार आहे. राघव परतल्यावर मालिकेमध्ये काय बदल होणार आहे ? राघवमध्ये काही बदल झाले आहेत ?
सरस्वतीमध्ये सरस्वती आणि राघव यांचा सुखाचा संसार सुरु होता. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले, आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली, मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले होते. तसेच तिने घरात तिची महत्त्वपूर्ण जागा निर्माण केली. सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. अचानक राघवच्या झालेल्या मृत्यूमुळे सरस्वती पूर्णत: खचून गेली आणि त्यामध्ये तिच्यावर कान्हाची जबाबदारी देखील असल्यामुळे तिला आता खंबीर आधाराची गरज होती. पण, या सगळ्या परिस्थिमध्ये देखील तिने स्वत:वरच्या विश्वासाला कधीच तुटू दिले नाही वा आपल्यावर असलेल्या घराच्या जबाबदारीवर दुर्लक्ष केले नाही. विद्युल आणि भिकू मामांच्या सगळ्या कारस्थानांना देखील तिने खंबीरपणे उत्तर दिले.
या सगळ्या अडचणीमध्ये मालिकेत राघवच्या सावत्र भावाची म्हणजेच रणजीत अचानक आल्यामुळे मालिकेला नवे वळण मिळाले. भांडण आणि नात्यातल्या कडूपणाचे हळूहळू मैत्रीत रुपांतर झाले आणि रणजीत मात्र राघवची वाट बघणाऱ्या सरस्वतीच्या प्रेमात पडला. परंतु सरस्वती अजूनही राघवचीच वाट बघत आहे. आता राघवच्या येण्याने पुढे काय होणार ? हा प्रश्न आहे.
या सगळ्यामध्ये राघवच्या येण्याने सरस्वतीच्या आयुष्याला कुठली कलाटणी मिळणार आहे ? विद्युल आणि भिकू मामाच्या कारस्थानांना अखेरीस पूर्णविराम लागेल ? रणजीतचे हे सत्य कळल्यावर राघव काय करेल ? सरस्वती हा गुंता कसा सोडवेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.