सांताक्लोज आनंद घेऊन येतो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 11:52 IST2017-12-23T06:22:37+5:302017-12-23T11:52:37+5:30

प्रत्‍येकाचा आवडता नाताळ सण जवळच आला आहे आणि आपण सर्वांनी सांताकडून मिळणा-या भेटवस्‍तूंची यादी तयार केली आहे. &TV वरील ...

Santa Claus enjoys! | सांताक्लोज आनंद घेऊन येतो !

सांताक्लोज आनंद घेऊन येतो !

रत्‍येकाचा आवडता नाताळ सण जवळच आला आहे आणि आपण सर्वांनी सांताकडून मिळणा-या भेटवस्‍तूंची यादी तयार केली आहे. &TV वरील तुमच्‍या लाडक्‍या कलाकारांना सांताकडून काय हवं असेल? आम्‍ही त्‍यांना दोन प्रश्‍न विचारले - यंदा ते सांताकडे कोणत्‍या गोष्‍टीची मागणी करणार आहेत? आणि त्यांना कोणाचा सिक्रेट सांता बनायचं आहे? याची उत्‍तरे त्‍यांच्‍याकडूनच ऐका... 

'द वॉईस इंडिया किड्स'चा परीक्षक शान 
 
यंदाच्‍या ख्रिसमसमध्‍ये माझी आई लवकर बरी व्‍हावी अशी माझी इच्‍छा आहे. तिच्‍या गुडघ्‍यांवर शस्‍त्रक्रिया करून ते बदलण्‍यात आले होते. मात्र, गेल्‍या दोन आठवड्यांपासून तिच्या गुडघ्‍यांमध्‍ये तीव्र वेदना होत आहेत. माझी इच्‍छा आहे की तिच्‍या गुडघ्‍यांमधील वेदना लवकर थांबाव्‍यात. त्यामुळे ती नववर्ष स्‍वागताचा आनंद घेऊ शकेल. मी सांताकडे हीच इच्‍छा व्‍यक्‍त करतो की माझ्या आईला होणा-या सर्व वेदना दूर होवोत. मला सिक्रेट सांता बनण्‍याची संधी मिळाली तर मी लोकांना त्‍यांच्‍या इच्‍छेप्रमाणे वागण्‍यास विरोध करणा-या सर्व संस्‍थांच्‍या विचारांमध्‍ये बदल घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करेन. मी त्‍यांना जगा व जगू द्या हा संदेश पटवून देईन.

'द वॉईस इंडिया किड्स'ची परीक्षक पलक मुच्‍छल 

सांता खरचं अस्तित्‍वात आहे की नाही याबाबत मी काहीशी संभ्रमात आहे. पण माझ्या आईवडिलांनी सांगितले की तो अस्तित्‍वात आहे. अगदी नुकतेच मला फेबसुकवर एक संदेश मिळाला की 'मी आठवतो का?'. हा संदेश पाहून मी गोंधळून गेले. पण संदेश केलेल्‍या व्‍यक्‍तीनेच मला सांगितले की गेल्‍या वर्षी तो सांता बनून माझ्या घरी आला होता. म्‍हणूनच मी काहीशी संभ्रमात व अचंबित आहे. यंदाच्‍या ख्रिसमसमध्‍ये मी सर्वत्र आनंद निर्माण होण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते. दरवर्षी मी एक गोष्‍ट करते, ती म्‍हणजे २४ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्री सांताप्रमाणे पोशाख परिधान करते आणि फूटपाथवर झोपलेल्‍या मुलांच्‍या जवळ भेटवस्‍तू ठेवते. ज्‍यामुळे सकाळी उठल्‍यानंतर भेटवस्‍तू पाहून त्‍यांना खूपच आनंद होतो. आणि यंदा सुद्धा मी हेच करणार आहे. 


'द वॉईस इंडिया किड्स'चा परीक्षक हिमेश रेशमिया 

मी सांताकडे सर्वांना आनंद, शांतता, एकता, चांगले आरोग्‍य व अमाप संपत्‍ती देण्‍याची मागणी करतो.  आपणा सर्वांना अभूतपूर्व सुख मिळो. मला माहित आहे की ही छोटीशी इच्‍छा नाही, पण सर्वजण याच सुखाचा पाठलाग करत असतात. मी सांता बनलो तर मी माझे आईवडिल आणि जगभरातील सर्व पालकांना भेटवस्‍तू देईन आणि त्‍यांचे जीवन आनंद, यश, अमाप आरोग्‍य व संपत्‍तीने भरून टाकेन. त्‍यांना असे जीवन देण्‍याचा प्रयत्‍न करेन, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या मुलांचे उत्‍तमप्रकारे पालनपोषण करू शकतील.


'भाबीजी घर पर है'मधील अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन 

यंदाच्‍या ख्रिसमसमध्‍ये मी सांताकडे मला उत्‍तम भूमिका असलेला चांगला चित्रपट मिळण्‍याची विनंती करते. असा चित्रपट जो वारसा व आठवणी निर्माण करेल आणि मी गेल्‍यानंतर देखील या आठवणी कायम राहतील. अशी भूमिका जिचा मला अभिमान वाटेल आणि ही भूमिका सदैव लोकांच्‍या स्‍मरणात राहील. मी सिक्रेट सांता बनत माझ्या पतीला श्रीलंकेमध्‍ये एक हॉलिडे ट्रिप देईन, जेथे ब्‍ल्‍यू व्‍हेल्‍स पाहायला मिळतील. ही त्‍याची इच्‍छा आहे. 

'द वॉईस इंडिया किड्स'चा सूत्रासंचालक जय भानुशाली 

यंदा ख्रिसमसमध्‍ये मी सांताकडे कोणतीच मागणी करणार नाही. मला त्‍यादिवशी भरपूर सरप्राईजेज व भेटवस्‍तू मिळणार आहे. कारण नाताळच्‍या दिवशी (२५ डिसेंबर) माझा वाढदिवस आहे. म्‍हणजेच मला भेटवस्‍तू मिळणारच. बालपणी मला वाटायचे की सांता मला भरपूर भेटवस्‍तू देतो. पण हळूहळू मला समजले की माझे मित्र व कुटुंबातील सदस्‍य मला हे सर्व सरप्राईजेज देत आहेत. मला सिक्रेट सांता बनण्‍याची संधी मिळाली तर मी माझ्या पत्‍नीकडून माझे सर्व क्रेडिट कार्डस् काढून घेण्‍याचा प्रयत्‍न करेन. मी जासूस बनत ही कार्डस् मिळवण्‍याचा प्रयत्‍न करेन. याचे कारण म्‍हणजे वर्षातील शेवटच्या तीन महिन्‍यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन्‍स केले जातात आणि या काळात ती भरपूर शॉपिंग करण्‍याची शक्‍यता आहे. म्‍हणून मी सिक्रेट सांता बनलो तर माझे सर्व क्रेडिट कार्डस् परत मिळवेन. 


'मेरी हानिकारक बीवी'मधील डॉ. ईरा ऊर्फ जिया शंकर 

मी सांताला सर्वत्र आनंद व शांतता पसरवण्‍याची विनंती करते. मी सिक्रेट सांता बनत अशा गोष्‍टी करू इच्छिते, ज्‍यामुळे सर्व वंचित मुलांच्‍या भविष्‍य उज्‍ज्‍वळ बनेल. 


'हाफ मॅरेज'मधील चांदनी ऊर्फ प्रियंका पुरोहित 

या टप्‍प्‍याला मी सांताकडे माझी मालिका 'हाफ मॅरेज'ला भव्‍य यश मिळण्‍याची विनंती करते. मला माझा कुटुंब व मित्रांचा सिक्रेट सांता बनावेसे वाटते. यावेळी मी भेटवस्‍तू देखील निश्चित केल्‍या आहेत. मी सॉल्‍ट रॉक लॅम्‍प देण्‍याचा विचार केला आहे. असे मानले जाते की सॉल्‍ट रॉक लॅम्‍प घरात कुठेही ठेवला असता तो घरातील नकारात्‍मक गोष्‍टींना दूर करतो. आणि सॉल्‍ट रॉक लॅम्‍प दिव्‍याचे देखील काम करतो. 

Web Title: Santa Claus enjoys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.