संजय नार्वेकर यांचे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:31 PM2023-01-12T18:31:02+5:302023-01-12T18:31:21+5:30

स्टार प्लस वरील 'गुम है किसीके प्यार में' या मालिकेत बाप आणि मुलीमधले सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळणार आहे.

Sanjay Narvekar Debuts in Hindi Television Industry, Appears in 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein' | संजय नार्वेकर यांचे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत

संजय नार्वेकर यांचे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत

googlenewsNext

स्टार प्लस वाहिनीवरील ’गुम है किसी के प्यार में मालिका जी २०२० पासून प्रसारित होत आहे. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहे. 'गुम है किसीके प्यार में' मधील कमल जोशी ही सईच्या वडिलांची व्यक्तिरेखा ते साकारत असून ही त्यांची पहिलीच हिंदी मालिका आहे. हे अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर. 

'गुम है किसीके प्यार में' मधील कमल जोशी या त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि सईसोबतच्या त्यांच्या बॉण्डिंगबद्दल संजय नार्वेकर म्हणतात, “गुम है किसी के प्यार में' ही एक बाप-मुलीच्या नात्याची भावनिक कथा आहे, ती दोन प्रेमी आणि पती-पत्नीच्या कथेवर प्रकाश टाकते. सध्याच्या घडामोडींमध्ये कमल जोशी नावाचा एक प्रामाणिक पोलीस निरीक्षकाचा हा ट्रॅक आहे. बाप म्हणून त्यांचे आपल्या मुलीवर सईवर खूप प्रेम आहे आणि त्यांना तिच्यासाठी सारे काही उत्तम हवे आहे. त्यांना तिला सुरक्षित आणि आनंदी ठेवायचे आहे. मात्र त्यांचे हे प्रेम आंधळे नाही, कधीकधी ते मुलीशी कठोर देखील होतात. कमल जोशी सईला 'माझी आई' म्हणून संबोधतात आणि ती त्यांना आबा म्हणते. बाप आणि मुलीमधले अतिशय सुरेख बंध या निमित्ताने रेखाटण्यात आले आहे.


कमल जोशी दोन भूमिकांमध्ये विभागलेला आहे, एक वडिलांची आणि दुसरी इन्स्पेक्टरची. सईला आई नाही आणि कमल तिच्यासाठी वडील आणि आईची दुहेरी भूमिका साकारत आहेत. हे पात्र कठोर आहे पण त्याचे आपल्या मुलीवरचे प्रेम त्याला खूप भावूक करते., असे नार्वेकर म्हणाले.  स्टार प्लस 'गुम है किसके प्यार में' मध्ये नील भट्ट एसीपी विराटच्या भूमिकेत, सई जोशीच्या भूमिकेत आयशा सिंग आणि पत्रलेखाच्या भूमिकेत ऐश्वर्या शर्मा असून याचे प्रसारण सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता केवळ स्टार प्लस वाहिनीवर करण्यात येते.

Web Title: Sanjay Narvekar Debuts in Hindi Television Industry, Appears in 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.