‘दिल संभल जा जरा’मध्ये संजय कपूरने घातला मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:50 IST2017-11-29T10:20:18+5:302017-11-29T15:50:18+5:30

‘दिल संभल जा जरा’ मालिकेतील विवाहाच्या प्रसंगासाठी अभिनेता संजय कपूरने मनीष मल्होत्रा या आपल्या जुन्या मित्राने डिझाईन केलेला सूट ...

Sanjay Kapoor in 'Dil Sebhele Jaa Jara' is a suit designed by Manish Malhotra! | ‘दिल संभल जा जरा’मध्ये संजय कपूरने घातला मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला सूट!

‘दिल संभल जा जरा’मध्ये संजय कपूरने घातला मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला सूट!

िल संभल जा जरा’ मालिकेतील विवाहाच्या प्रसंगासाठी अभिनेता संजय कपूरने मनीष मल्होत्रा या आपल्या जुन्या मित्राने डिझाईन केलेला सूट वापरला आहे. तब्बल दशकभरानंतर पुन्हा एकदा टीव्ही मालिकेत भूमिका साकारणारा संजय कपूर मालिकेतील आपल्या लूकबद्दल विशेष जागरूक असून त्यासाठी त्याने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.मालिकेत अनंत माथूर या उद्योगपतीची भूमिका उत्तम रीतीने साकारीत असल्याबद्दल संजय कपूरची त्याचे मित्र तसेच नातलगांकडून प्रशंसा होत आहे. भाऊ अनिल कपूर, पुतणी सोनम कपूर, निर्माता-दिर्ग्शक करण जोहर तसेच इतर अनेक नामवंतांनी संजय कपूरचे या भूमिकेबद्दल अभिनंदन केले आहे. संजयने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असून त्याचे परिणाम त्याच्या अभिनयातून दिसून येत आहेत.मालिकेत लवकरच त्याच्या विवाहाचा प्रसंग चित्रीत होणार असून त्यावेळी परिधान करण्यासाठी त्याने आपला मित्र डिझायनर मनीष मल्होत्रा याला आपल्यासाठी विशेष सूट डिझाईन करण्याची विनंती केली. हे दोघे पूर्वी मनीष मल्होत्राच्या दुबईतील कार्यक्रमात एकत्र दिसले होते. एका सूत्राने सांगितले, “संजय आणि मनीष हे दोघे जुने मित्र आहेत. आपल्या अतिशय व्यग्र असतानाही आपला मित्र संजयने विनंती केल्यामुळे मनीषने आपल्या भरगच्च वेळापत्रकातून वेळ काढून संजय कपूरच्या व्यक्तिरेखेला शोभेल असा सूट डिझाईन केला.”

अभिनेता संजय कपूर तब्बल १३ वर्ष  इंडस्ट्रीपासून दूर राहिला. संजय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात 1995 साली आलेल्या प्रेम चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती तब्बू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर तो दिसला बॉलिवूड डिवा माधुरी दीक्षितसोबत राजामध्ये. हा चित्रपट संजय कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर रातो-रात तो स्टार बनला. मात्र या चित्रपटानंतर संजयला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर त्यांने तीन चित्रपटांची देखील निर्मिती केली. मात्र यातही त्याला फारसे म्हणावे तसे यश मिळाले नाही.
Also Read: छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण - संजय कपूर

संजय कपूरच्या छोट्या पडद्यावरच्या प्रोजेक्टविषयी सिएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,  २००३ मध्ये मी अखेरीस छोट्या पडद्यावर काम केले होते. या मधल्या काळात माझ्याकडे काम नव्हते असे नाही. कारण याकाळात मी ब-याचशा चित्रपटांची निर्मिती केली. शिवाय काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला. छोट्या पडद्यावर परतण्यासाठी मी संधीच्या शोधात होतो. दुर्दैवाने या काळात मला संधी मिळाली नाही. आता सगळे योग जुळून आल्याने मी, छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. खरं तर मला सुरुवातीपासूनच छोट्या पडद्याचे आकर्षण राहिले आहे.

Web Title: Sanjay Kapoor in 'Dil Sebhele Jaa Jara' is a suit designed by Manish Malhotra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.