​संगीता घोष का चिडली आहे चक्रव्यूहच्या निर्मात्यांवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 13:07 IST2017-06-16T07:37:33+5:302017-06-16T13:07:33+5:30

संगीता घोष चक्रव्यूह या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण ...

Sangeeta Ghosh's chidley is on the makers of Chakravyu? | ​संगीता घोष का चिडली आहे चक्रव्यूहच्या निर्मात्यांवर?

​संगीता घोष का चिडली आहे चक्रव्यूहच्या निर्मात्यांवर?

गीता घोष चक्रव्यूह या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेतील निर्मात्यांवर संगीता घोष चिडली आहे. तसेच सेटवर ती खूप नखरे करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी तिला विचारण्यात आले होते. पण काही कारणास्तव ही भूमिका नारायण शास्त्रीकडे गेली, याचा संगीताला राग आलेला आहे.
चक्रव्यूह या मालिकेत नारायणी शास्त्री प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती प्रेक्षकांना सतरूपा या व्यक्तिरेखेत दिसणार असून ती राजमाता दाखवली जाणार आहे. ती अतिशय साहसी आई असून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकते अशी तिची व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा खूपच चांगली असून कोणत्याही कलाकाराला अशी व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा असते. या भूमिकेसाठी सुरुवातीला संगीता घोषची निवड करण्यात आली होती. या भूमिकेसाठी संगीताची निर्मात्यांसोबत बोलणी देखील झाली होती. तीच ही भूमिका साकारणार असे ठरले होते. पण ज्यावेळी नारायणी शास्त्रीची या व्यक्तिरेखेसाठी लूक टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी नारायणी या भूमिकेसाठी अधिक योग्य असल्याचे मालिकेच्या टीमला वाटले आणि तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. ऐनवेळी निर्मात्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि संगीताला या मालिकेतील दुसरी भूमिका ऑफर करण्यात आली. आता ती या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. संगीता या नकारात्मक भूमिकेसाठी योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे मत आहे. पण या सगळ्यामुळे संगीता घोषला निर्मात्यांचा प्रचंड राग आला आहे. मालिका सुरू व्हायच्या आधीच संगीता आणि निर्मात्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. 

Web Title: Sangeeta Ghosh's chidley is on the makers of Chakravyu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.