‘रेती’चा झंझावात गुढी पाडव्यापासून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:48 IST2016-04-07T23:48:47+5:302016-04-07T16:48:47+5:30

रेती उपशासारख्या काळ्या धंद्याचा स्फोटक विषय, सादरीकरणातील भव्यता आणि नावीन्य, तसेच या जोडीला कसदार कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे बहुचर्चित ...

'Sandi' storm from Gudi Padwa! | ‘रेती’चा झंझावात गुढी पाडव्यापासून!

‘रेती’चा झंझावात गुढी पाडव्यापासून!

ती उपशासारख्या काळ्या धंद्याचा स्फोटक विषय, सादरीकरणातील भव्यता आणि नावीन्य, तसेच या जोडीला कसदार कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे बहुचर्चित ठरलेला अथर्व मूव्हीजचा ‘रेती’ हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. बॉक्स आॅफिसवर हिट ठरेल, असा सिनेसमीक्षकांचा अंदाज आहे. सुहास भोसले यांचे दिग्दर्शन आणि देवेन कापडनीस यांची पटकथा व सहज संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान असून, किशोर कदम यांची चित्रपटातील भूमिका आजपर्यंतच्या भूमिकांपैकीची सर्वोत्तम ठरेल, असे बोलले जात आहे.
रामगोपाल वर्मांचा ‘कंपनी’ हा गँगवॉर थ्रीलर २००२ मध्ये बॉलिवूडच्या बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. गुंडांच्या एका कंपनीने काळ्या धंद्यांसाठी दहशतवादाचा दबदबा शहरात निर्माण केल्यानंतर या टोळीची सूत्रे आपल्याकडे आली पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा एकाच्या मनात जागृत होते आणि मग एका जबरदस्त संघर्षनाट्याला प्रारंभ होतो, असे या चित्रपटाचे कथाबीज होते. ‘रेती’तही अशाच महत्त्वाकांक्षेचा प्रवास आहे. रेती चित्रपटात रेतीमाफिया किसनची भूमिका किशोर कदम साकारत असून, त्याचे साम्राज्य ताब्यात घेण्याची इच्छा शंकरची भूमिका करीत असलेल्या चिन्मय मांडलेकरमध्ये निर्माण होते आणि संघर्षाची ठिणगी पेटते. या ट्रॅकवरून चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, असे या चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे यांनी सांगितले.
वाळूतून मिळणारा अमाप पैसा आणि त्यासाठी ठिकठिकाणी माफियांनी उभी केलेली साम्राज्ये यावर ‘रेती’ बेतला आहे. राजकारणी, भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि माफिया यांच्या साखळीवर रेतीतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. नाशिकच्या मोसम या नदीपात्राचे जिवंत सिनेछायाचित्रण प्रताप नायर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता अरुण रहाणे आहेत. प्रसिद्ध गायक शान संगीतकाराच्या भूमिकेत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत असून, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, संजय खापरे, विद्याधर जोशी, दीपक करंजीकर, गायत्री सोहम आदी नामवंत कलाकारांनी चित्रपट जिवंत केला आहे.

Web Title: 'Sandi' storm from Gudi Padwa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.