​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सलमान खानमुळे होणार पोपटलालचे लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 15:34 IST2017-06-12T10:04:41+5:302017-06-12T15:34:41+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पोपटलालचे लग्न होणार ...

Salman Khan's wedding in Parathlal wedding? | ​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सलमान खानमुळे होणार पोपटलालचे लग्न?

​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सलमान खानमुळे होणार पोपटलालचे लग्न?

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पोपटलालचे लग्न होणार असे नेहमीच आपल्याला वाटते. पण शेवटी काहीतरी समस्या निर्माण होते आणि पोपटलाल काही बोहल्यावर चढत नाही. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमात आतापर्यंत सलमान खानने दोनदा हजेरी लावली आहे, तो त्याच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात आला होता. सध्या तो टयुबलाईट या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो तारक मेहताच्या सेटवर येणार आहे. या मालिकेत आता पुन्हा एकदा पोपटलाल एका मुलीच्या प्रेमात पडणार आहे. झिलमिल असे त्या मुलीचे नाव असून तो तिला प्रपोज करणार आहे. पण सलमान खानसोबत सेल्फी काढून दिल्यासच मी तुझ्याशी लग्न करेन अशी ती पोपटलालसमोर अट ठेवणार आहे. त्यामुळे गोकुळधाम सोसोयटीमध्ये सलमानला आणण्यासाठी पोपटलाल प्रयत्न करणार आहे.
पोपटलालच्या प्रयत्नाने सलमान सोसायटीत येणार आहे. पण तारक मेहताच्या सेटवर यावेळी सलमान एकटा नाही तर सोहेल खानसोबत हजेरी लावणार आहे. सलमान आतापर्यंत कार्यक्रमात दोनदा आला असल्याने या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांना तो चांगलाच ओळखतो. याविषयी पोपटलालची व्यक्तिरेखा साकारणारा श्याम पाठक सांगतो, सलमानसोबत काम करायला नेहमीच मजा येते. आमच्यासोबत तो मिळूनमिसळून वागतो. तसेच टप्पूसेनासोबत देखील खूप धमाल मस्ती करतो. सोहेल खान यांचे व्यक्तिमत्त्व देखील खूप पॉझिटिव्ह आहे. आम्ही त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती केली. तसेच आम्ही सगळ्यांनी सलमान आणि सोहेलसोबत खूप सारे सेल्फी काढले. 

Web Title: Salman Khan's wedding in Parathlal wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.