१७ फेब्रुवारी रोजी कॉमेडी हाय स्कूलच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये झळकणार दबंग सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 15:42 IST2018-02-15T10:12:27+5:302018-02-15T15:42:27+5:30

राम कपूर यांचे सूत्रसंचालन असलेल्या डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील नवीन शो कॉमेडी हाय स्कूलच्या ग्रॅन्ड प्रीमिअर एपिसोडच्या धमाक्यासाठी सज्ज व्हा.या ...

Salman Khan will be seen in the premiere episode of Comedy High School on 17th February | १७ फेब्रुवारी रोजी कॉमेडी हाय स्कूलच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये झळकणार दबंग सलमान खान

१७ फेब्रुवारी रोजी कॉमेडी हाय स्कूलच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये झळकणार दबंग सलमान खान

म कपूर यांचे सूत्रसंचालन असलेल्या डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील नवीन शो कॉमेडी हाय स्कूलच्या ग्रॅन्ड प्रीमिअर एपिसोडच्या धमाक्यासाठी सज्ज व्हा.या शो ची सुरूवात होणार असून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यात विशेष अतिथीच्या रूपात दिसून येईल आणि यातील काही अफलातून अॅक्ट्‌स प्रेक्षकांना गुदगुल्या करतील.कॉमेडी हायस्कूलमधून समाज, संस्कृती, शिक्षण आणि वर्तमानातील घडामोडींवर क्लासरूमवर आधारित सेटअपमधून हलक्याफुलक्या पद्धतीने वेध घेतला जातो. कॉमेडी हायस्कूल ही एक स्वच्छ कॉमेडी असून यात विभिन्न संकल्पनांवर आधारित एपिसोड्‌स असतील. ह्या शाळेमध्ये इंग्रजी, हिंदी, शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक विषयांचे शिक्षक, एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक आणि नैतिक व सच्चे ट्रस्टीही आहेत. प्रत्येक आठवड्‌याला वेगवेगळ्‌या अवतारात नावाजलेले सेलेब्रिटीज ह्या शाळेला भेट देतील. ह्या शोमध्ये राम कपूर,गोपाल दत्त, परितोष त्रिपाठी, कृष्णा भट्ट, जसमीत भाटिया आणि दीपक दत्ता अशा ख्यातनाम कलाकारांचा समावेश आहे.ह्यानिमित्ताने सलमान खान म्हणाला, “कॉमेडी हाय स्कूलच्या चित्रीकरणाच्या वेळेस मला खूप मजा आली.हा एक स्वच्छ कॉमेडी शो आहे.हा विनोदी आहे पण यातील विनोदी मुळीच चावट नाहीत.मला एकाही क्षणी अवघडल्यासारखे वाटले नाही.” ह्या शोमधील कलाकारांबद्दल सलमान खान पुढे म्हणाला,“राम कपूर, गोपाल दत्त यांसारख्या अभिनेत्यांची आपली अशी एक शैली आहे, जी ह्याआधी टेलिव्हिजनवर कधीही पाहायला मिळालेली नाही. माझ्या मते हा शो देशभरातील चाहत्यांना निश्चितपणे आवडेल.”ह्या भागात अनेक वेळा सलमान अक्षरशः हसूनहसून लोटपोट होत जमिनीवर लोळताना दिसेल आणि आपल्या विनोदी कॉमेंट्रीसह सर्वांचे मनोरंजन करेल. एवढेच नाही तर त्याचे करवाचौथ अॅक्ट आणि लिजंडरी दीदी तेरा देवर दीवाना हे अॅक्ट्‌स तर प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट करतील.

राम कपूरला आपण घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. अनेक चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिका साकारतो. घर एक मंदिर या मालिकेतील रामच्या कामाचे कौतुक झाले असले तरी त्या मालिकेमुळे त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो केवळ एका भागाचे १ लाख २५ हजार रुपये घेतो.

Web Title: Salman Khan will be seen in the premiere episode of Comedy High School on 17th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.