सलमान खानने दस का दमच्या प्रोमोसाठी केले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 13:00 IST2018-02-15T07:30:50+5:302018-02-15T13:00:50+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बिग बॉसच्या अनेक सिझनचे आजवर सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन काहीच महिन्यांपूर्वी ...

Salman Khan shot bananas for his ten promos | सलमान खानने दस का दमच्या प्रोमोसाठी केले चित्रीकरण

सलमान खानने दस का दमच्या प्रोमोसाठी केले चित्रीकरण

लिवूडचा दबंग खान सलमान खानने बिग बॉसच्या अनेक सिझनचे आजवर सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन काहीच महिन्यांपूर्वी संपला असून या कार्यक्रमातील सलमानच्या सूत्रसंचालनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. सलमानने गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला एक सूत्रसंलाचकाच्या भूमिकेत देखील स्वीकारले आहे. सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाचे काही सिझन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सलमानने रामराम ठोकला. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात व्यग्र झाला. बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या अनेक सिझनमध्ये टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. दस का दम हा कार्यक्रम परत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. पण सलमानने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण सलमानच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सलमानचा दस का दम हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी सलमानने नुकतेच चित्रीकरण केले आहे. सलमानचा हा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून सलमानचे एक वेगळे रूप कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
दस का दम या कार्यक्रमाच्या आजवरच्या सिझनपेक्षा हा सिझन खूपच वेगळा असणार आहे. या सिझनचे वैशिष्ट्य म्हणजे या सिझनमध्ये प्रेक्षकांना घरबसल्या सहभागी होता येणार आहे. आजवर केवळ या कार्यक्रमातील स्पर्धकच हा कार्यक्रम सलमानसोबत खेळू शकत होते. पण यंदा प्रेक्षक देखील घरबसल्या सलमानच्या या कार्यक्रमाचे भाग होऊ शकणार आहेत. सलमानने नुकत्याच या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी चित्रीकरण केले. या चित्रीकरणासाठी सलमान खूपच उत्सुक होता. या चित्रीकरणाच्या वेळी त्याने खूपच मजा-मस्ती केली. 
दस का दम या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन सलमान नव्हे तर रणवीर सिंग होस्ट करणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण या बातमीमुळे सलमानच्या फॅन्सना नक्कीच आनंद होणार आहे. 

Also Read : ​सलमान खान आला या अभिनेत्याच्या मदतीला धावून

Web Title: Salman Khan shot bananas for his ten promos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.