दस का दम या कार्यक्रमासाठी सलमान खानला मिळणार इतके मानधन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 12:40 IST2018-03-19T07:10:01+5:302018-03-19T12:40:01+5:30
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बिग बॉसच्या अनेक सिझनचे आजवर सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन काहीच महिन्यांपूर्वी ...
.jpg)
दस का दम या कार्यक्रमासाठी सलमान खानला मिळणार इतके मानधन...
ब लिवूडचा दबंग खान सलमान खानने बिग बॉसच्या अनेक सिझनचे आजवर सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन काहीच महिन्यांपूर्वी संपला असून या कार्यक्रमातील सलमानच्या सूत्रसंचालनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. सलमानने गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला एक सूत्रसंलाचकाच्या भूमिकेत देखील स्वीकारले आहे. सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाचे काही सिझन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सलमानने रामराम ठोकला. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात व्यग्र झाला. बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या अनेक सिझनमध्ये टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे.
सलमान खान बिग बॉस नंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. दस का दम या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमातही तो प्रेक्षकांना सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सलमान 'रेस ३ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'रेस ३'ची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच सलमान खान 'दस का दम'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाची पहिली झलक नुकतीच दाखवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत.
सलमान खानला दस का दम या कार्यक्रमासाठी तगडे मानधन मिळणार असल्याचे कळतेय. सलमानला या कार्यक्रमासाठी किती मानधन मिळते हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सलमानला दम का दम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी तब्बल ७८ कोटी दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
दस का दम या कार्यक्रमाच्या आजवरच्या सिझनपेक्षा हा सिझन खूपच वेगळा असणार आहे. या सिझनचे वैशिष्ट्य म्हणजे या सिझनमध्ये प्रेक्षकांना घरबसल्या सहभागी होता येणार आहे. आजवर केवळ या कार्यक्रमातील स्पर्धकच हा कार्यक्रम सलमानसोबत खेळू शकत होते. पण यंदा प्रेक्षक देखील घरबसल्या सलमानच्या या कार्यक्रमाचे भाग होऊ शकणार आहेत.
Also Read : जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके घर