कोण होईल करोडपतीच्या मंचावर अवतरल्या सई ताम्हणकर आणि प्रिया बापट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 15:51 IST2016-11-04T15:49:27+5:302016-11-04T15:51:03+5:30
सामान्यांचे स्वप्न साकार करणारा कोण होईल मराठी करोडपतीच्या मंचावर सुरूवातीपासूनच वेगवेगळे सेलिब्रेटींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.इतकेच नाहीतर सेलिब्रेटींनी जिंकलेल्या ...

कोण होईल करोडपतीच्या मंचावर अवतरल्या सई ताम्हणकर आणि प्रिया बापट
स मान्यांचे स्वप्न साकार करणारा कोण होईल मराठी करोडपतीच्या मंचावर सुरूवातीपासूनच वेगवेगळे सेलिब्रेटींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.इतकेच नाहीतर सेलिब्रेटींनी जिंकलेल्या धनराशीने त्यांनी गरजुंना मदतही केली. या मंचाच्या निमित्ताने कलाकरांविषयी त्यांच्या आवडीनिवडीही रसिकांना जाणून घेण्यात आल्या. आता पुन्हा एकदा सेलिब्रटींची जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट 'वजनदार' सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावली. सिनेमासाठी या दोघींनीही खूप मेहनत घेतली यावेळी त्यांनी त्यांचे अनुभवही सांगितले. या कार्यक्रमात गेम खेळत सुत्रसंचालक स्वप्निल जोशीसह बरीच धम्माल मस्ती केली आणि जुन्या आठवणी देखील सांगितल्या.
![]()