कर्मफलदाता शनी मालिकेत यमाच्या भूमिकेत दिसणार सचिन यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 12:33 IST2017-10-19T07:03:39+5:302017-10-19T12:33:39+5:30

कलर्सवरील पौराणिक मालिका कर्मफलदाता शनिने खूप लोकप्रियता मिळवली आहे. शोमध्ये दहा वर्षांची लीप घेतली जात असताना, रोहित खुराणा मोठ्या ...

Sachin Yadav will appear in the role of Yamaha in the Karmaphala Shani series | कर्मफलदाता शनी मालिकेत यमाच्या भूमिकेत दिसणार सचिन यादव

कर्मफलदाता शनी मालिकेत यमाच्या भूमिकेत दिसणार सचिन यादव

र्सवरील पौराणिक मालिका कर्मफलदाता शनिने खूप लोकप्रियता मिळवली आहे. शोमध्ये दहा वर्षांची लीप घेतली जात असताना, रोहित खुराणा मोठ्या शनिची भूमिका करणार आहे. यमाची भूमिका सचिन यादव तर यमीची भूमिका काजोल श्रीवास्तव साकारणार आहेत.  

गुरू बृहस्पती यांच्याकडील शिक्षण संपवून यम आणि यमी सूर्यलोकात एका दशका नंतर परतणार आहेत. ते दोघेही वेगवेगळया व्यक्तिमत्वाचे दाखविले आहेत. इंद्राच्या प्रभावाखाली यम शनिवर नाराज आहे, तर यमी काळजी घेणारी आणि द्याळू दाखविली आहे. 

कर्म फलदाता शनिमध्ये  झेप घेतल्या नंतर, प्रेक्षकांना खूप काही पहायला मिळणार आहे. शो मधील पॉवर पॅक्ड नाट्य आणि लक्षवेधक कथेने ते नक्कीच खिळून राहणार आहेत. 

या मालिकेत  जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर सलील अंकोलाने सुर्यदेवाची भूमिका साकरली आहे.शनीदेवाची भूमिका कार्तिकेय मालवीयने या बालकलाकारने साकरली आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेत कही किसी रोज, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये सुधा चंद्रन यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत आणि आता त्या कर्मफलदाता शनी या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत त्या सिंहिका ही भूमिका साकारणार आहेत. सिहिंका राहू आणि केतू यांची आई आहे. तिच्या मुलाला म्हणजेच राहूला दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा बदला घेण्यासाठी ती येणार आहे. या मालिकेत जोहेब सिद्दीकी राहूची भूमिका साकारत आहे. सिहिंकाच्या एंट्रीमुळे शनीच्या म्हणजेच कार्तिकेय मालवीयच्या दुःखात आणखी भर पडणार आहे. कारण सिहिंका शनी हाती घेत असलेल्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणार आहे. सिहिंकाला ब्रम्हदेवाकडून एक वरदान मिळाले आहे. यामुळे ती लोकांच्या छायांवर नियंत्रण ठेवू शकते. शनीने एका युद्धाच्य दरम्यान राहूचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यामुळे आपल्या मुलाच्या दुरावस्थेला शनीच जबाबदार असल्याचे तिचे मत आहे आणि त्यामुळेच त्याला शक्य त्या मार्गाने त्रास देण्याचा ती प्रयत्न करते.

Web Title: Sachin Yadav will appear in the role of Yamaha in the Karmaphala Shani series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.