'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमांचक वळणावर, पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य उलगडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:06 PM2023-11-27T15:06:18+5:302023-11-27T15:18:02+5:30

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांचं आहे.

Saatvya mulichi saatvi mulgi marathi serial episodic | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमांचक वळणावर, पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य उलगडणार?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमांचक वळणावर, पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य उलगडणार?

सातव्या मुलीची सातवी मुलगी हि मालिका सध्या उत्कांवर्धक वळणावर आली आहेत. रोज नवे ट्विस्ट या मालिकेत घडत असतात. मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार हे जाणून  घेण्याची  उत्सुकता सगळ्यांना आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य ह्या आठवड्यात समोर येईल. पंचपिटिका रहस्य एक रोमांचक वळण घेईल जेव्हा तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेलं रहस्य वाचायला अवघड जाईल, कारण ते रहस्य सर्पलिपीमध्ये आहे.  या पेटीमध्ये  विरोचक कोण आहे हे ही रहस्य उलगडू  शकत. इंद्राणी कशी करेल नेत्राच रक्षण? काय होईल जेव्हा रुपाली समोर येईल विरोचकाच नाव? पानावरच्या रहस्यामध्ये  असं काय लिहलं आहे जे वाचून नेत्रा आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन हलणार आहे.

तिसऱ्या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का? पेटी मधल्या मजकूरावर लिहिलेली सर्पलिपी वाचायला कोण करेल ह्यांची मदत? तिसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.  

Web Title: Saatvya mulichi saatvi mulgi marathi serial episodic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.