Bigg Boss 14 शोमधली सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे रुबीना दिलैक,आठवड्यासाठी लाखों रु करते चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:25 PM2021-02-17T17:25:35+5:302021-02-17T17:29:34+5:30

गेल्या आठवड्याप्रमाणे तो कंटेस्टंट्सवर भडकला नाही. तसेच शोमध्ये त्याचा गमतीशीर अंदाजही दिसला.

Rubina Dilaik Highest Paid Contestant Of Bigg Boss 14 | Bigg Boss 14 शोमधली सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे रुबीना दिलैक,आठवड्यासाठी लाखों रु करते चार्ज

Bigg Boss 14 शोमधली सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे रुबीना दिलैक,आठवड्यासाठी लाखों रु करते चार्ज

googlenewsNext

'बिग बॉस-1४' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही आहे. या सर्वासाठी कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. रिपोर्ट्सनुसार, रुबीना दिलैक या सिझनमधली सर्वाधिक महागडी कंटेस्टंट आहे. तिला एका आठवड्यासाठी ५ लाख रुपये मिळतात. तर जैस्मिन भसीन 3 लाख,  सारा गुरपाल 2 लाख, निशांत 2 लाख रुपये इतके मानधन मिळाले होते.

 

जस्मिन, सारा गुरपाल आणि निशांत हे आधीच शोमधून बाहेर पडले आहेत.पण चॅलेंजर्स म्हणून घरात एंट्री केलेले हिना खान आणि गौहर खान यांनाही केवळ दोन आठवड्यासाठी २० लाख रु इतके मानधन दिले गेले होेत. 'बिग बॉस' च्या दुसऱ्या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान काहीसा शांत दिसला. गेल्या आठवड्याप्रमाणे तो कंटेस्टंट्सवर भडकला नाही. तसेच शोमध्ये त्याचा गमतीशीर अंदाजही दिसला.


काही दिवसांपूर्वीच वीकेंड वॉरमध्ये सलमान खानने अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची शाळा घेतला होती.नेहमीच सलमान रुबीना आणि अभिनव यांच्या विरोधात बोलतो हे रुबीनाला चांगलेच खटकले होते. रुबीना नाराज झाली होती याच कारणावरुन तिने या शोमध्ये काम करायच नसल्याचे स्पष्ट केले होते. सलमान खानने अभिनव शुक्लाची खिल्ली उडवताना त्याला सामान असं म्हटलं होते.

 

 

हे सामान कुठून घेऊन आलीस असा प्रश्न सलमानने रुबीनाला विचारला. त्यावर अभिनवला सामान म्हटलेलं रुबीनाला आवडलं नव्हते. त्यामुळे कन्फेशन रुममध्ये रुबीनाने सलमानची बिग बॉसकडे तक्रार केली होती तसेच जिथे सन्मान मिळत नसेल तिथे काम करण्याची ईच्छा नसल्याचे तिने सांगितले होते.

चर्चेत राहण्यासाठी राहुल वैद्य करतोय लाखो रुपये खर्च? जस्मिन भसिनचा धक्कादायक खुलासा

प्रत्येकजण आपल्या मेहनत करतोय, असे असताना मात्र गायक राहुल वैद्यने रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळाच फंडा वापरत असल्याच्या चर्चा घरातच सुरु झाल्या आहेत. जास्मिन भसीनने सांगितले की, सोशल मीडियावर रुबीना आणि राहुल वैद्या दोघांची अधिक चर्चा पाहायला मिळते. इतकेच नाही तर पब्लिसिटीमध्ये राहण्यासाठी, सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये राहण्यासाठी राहुल वैद्य प्रत्येक आठवड्याला ५ लाख रुपये खर्च करत असल्याचे तिने म्हटले आहे.

Web Title: Rubina Dilaik Highest Paid Contestant Of Bigg Boss 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.