रोनित करणार दिग्दर्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:40 IST2016-06-07T11:10:11+5:302016-06-07T16:40:11+5:30
रोनित रॉय आजच्या घडीतील छोट्या पडद्यावरचे सर्वात मोठे नाव आहे. अनेक वर्ष मालिकांमध्ये काम केल्यानंतर रोनित रॉय आता निर्मितीचा ...
रोनित करणार दिग्दर्शन?
र नित रॉय आजच्या घडीतील छोट्या पडद्यावरचे सर्वात मोठे नाव आहे. अनेक वर्ष मालिकांमध्ये काम केल्यानंतर रोनित रॉय आता निर्मितीचा आणि दिग्दर्शनाचा विचार करत आहे. मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाबबत एका वाहिनीसोबत रोनितची सध्या चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. रोनित लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रोजक्टबाबत रोनितने अधिक माहिती दिली नसली तरी लवकरच तो दिग्दर्शक अथवा निर्मात्याच्या रूपात झळकणार असल्याचे त्याने म्हटले आहे. पण ही मालिका येईपर्यंत डेली सोपमध्ये काम न करण्याचा निर्णय रोनितने घेतला आहे. त्याच्यामते अनेकवेळा व्यक्तिरेखेविषयी सांगितली जाणारी माहिती आणि पडद्यावर साकारली गेेलेली व्यक्तिरेखा ही खूप वेगळी असते. त्यामुळे जोपर्यंत स्वतः निर्मिती अथवा दिग्दर्शन करत नाही तोपर्यंत डेली सोपपासून दूरच राहायचे असा निर्णय रोनितने घेतला आहे.