कौन है ? मध्ये झळकणार रोमित प्रशर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 06:30 IST2018-08-03T15:31:28+5:302018-08-04T06:30:00+5:30
कलर्सवरील मालिका कौन है? आपल्या गूढ कथांनी प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या आठवड्याच्या एपिसोड मध्ये शंकचुन्नीची भितीदायक कथा सादर केली जाणार आहे

कौन है ? मध्ये झळकणार रोमित प्रशर
कलर्सवरील मालिका कौन है? आपल्या गूढ कथांनी प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या आठवड्याच्या एपिसोड मध्ये शंकचुन्नीची भितीदायक कथा सादर केली जाणार आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येणार आहेत. आगामी एपिसोड मध्ये टेलिव्हिजनचा चॉकलेट बॉय रोमिक राज प्रशर दिसणार आहे. पश्चिम बंगाल मधील एका लहान गावात घडणाऱ्या शंकचुन्नी मध्ये प्रत्येक नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एक परंपरा पाळावी लागते ज्यात त्यांना कालरात्रीचे निरीक्षण करावे लागते. त्या गावाला मिळालेल्या आत्म्यांच्या वाईट शापामुळे, जर त्यात कोणते जोडपे अयशस्वी झाले तर त्यांच्यावर शंकचुन्नी चुडैलचा हल्ला होतो. तीन नवीन लग्न झालेल्या जोडपे त्या गावात मुक्कामासाठी एक रात्र थांबले आणि तेव्हा या आत्म्यांनी त्यांना झपाटल्यावर नरकाची दारे त्यांच्यासाठी खुली झाली.
त्याच्या भूमिकेविषयी बोलताना, रोमित राज प्रशर म्हणाला, “ कौन है? साठी चार रात्री चित्रीकरण करण्याचा अनुभव अतिशय विस्मयकारी होता. काही लोकांचा भुतांवर विश्वास नसतो आणि ज्यांना अनुभव येतो त्यांच्यावर ते लोक हसतात. मला फक्त लोकांना इतकेच सांगायचे आहे की प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. जसे चांगले आणि वाईट लोक असतात तशाच चांगल्या आणि वाईट शक्तीसुद्धा असतात.”