​बिन कुछ कहे या मालिकेत निखिल सबरवाल साकारणार आर्मी ऑफिसरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 15:09 IST2017-04-28T09:39:42+5:302017-04-28T15:09:42+5:30

बिन कुछ कहे या मालिकेत सध्या प्रेक्षकांना निखिल सबरवालला पाहायला मिळत आहे. निखिल या मालिकेत अक्षय शर्मा ही भूमिका ...

The role of the army officer to fulfill Nikhil Sabarwal in this series, saying something unimaginable | ​बिन कुछ कहे या मालिकेत निखिल सबरवाल साकारणार आर्मी ऑफिसरची भूमिका

​बिन कुछ कहे या मालिकेत निखिल सबरवाल साकारणार आर्मी ऑफिसरची भूमिका

न कुछ कहे या मालिकेत सध्या प्रेक्षकांना निखिल सबरवालला पाहायला मिळत आहे. निखिल या मालिकेत अक्षय शर्मा ही भूमिका साकारत असून प्रेक्षकांना त्याची ही भूमिका खूपच आवडत आहे. महिला तर त्याच्या या भूमिकेच्या प्रेमातच पडल्या आहेत. या मालिकेत अतिशय संस्कारी मुलाची तो व्यक्तिरेखा साकारत आहे.
या मालिकेतील त्याची भूमिका ही खूप विशेष आहे. या मालिकेतील अक्षयचे आर्मीमध्ये प्रवेश करण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्याने एमबीए केले आहे. प्रत्येकाच्या संकटात नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहाणारा तो आहे. त्यामुळे कोणत्याही मुलीसाठी तो अगदी योग्य जोडीदार आहे. अक्षयचे मायरा या मुलीवर लहानपणापासून प्रेम आहे. आपल्या आयुष्यातील जोडीदार म्हणून दुसऱ्या कोणाचा तो विचारही करू शकत नाही. त्या दोघांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली आहे.
आपल्या करियरमध्ये निखिल पहिल्यांदाच आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेद्वारे तो त्याच्या वडिलांना आदरांजली वाहाणार आहे. या भूमिकेबद्दल निखिल सांगतो, आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही भूमिका माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. कारण माझे बाबा आर्मी अधिकारी असून ते दोन वर्षांपूर्वी मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. मी आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत असल्याचे ऐकून माझे बाबादेखील खूप खूश झाले आहेत. या भूमिकेसाठी सध्या मी त्यांच्याकडून क्लासेस घेत आहे. देहबोली, भाषा आणि आवाजाची लकब यासाठी मी सध्या त्यांच्याकडून धडे घेत आहे. त्यांची मला ही भूमिका साकारण्यासाठी खूप मदत होत आहे. 

Web Title: The role of the army officer to fulfill Nikhil Sabarwal in this series, saying something unimaginable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.