​आकांक्षा जुनेजा इश्क में मरजावामध्ये दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 15:41 IST2018-04-04T10:11:41+5:302018-04-04T15:41:41+5:30

कलर्सवरील इश्क में मरजावा हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ...

In the role of Akanksha Junja Ishq in MERJAVA | ​आकांक्षा जुनेजा इश्क में मरजावामध्ये दिसणार या भूमिकेत

​आकांक्षा जुनेजा इश्क में मरजावामध्ये दिसणार या भूमिकेत

र्सवरील इश्क में मरजावा हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. इश्क में मरजावा मधील सूड आणि द्वेषाची कथा ही आजच्या मालिकेतील कथांपेक्षा खूपच वेगळी असल्याने ती प्रेक्षकांना आवडत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना खूप सारे एन्टरटेन्मेंट पाहायला मिळणार आहे. इश्क में मरजावा या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार असून या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत आता वेदिका नावाच्या एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे आणि ही भूमिका आकांक्षा जुनेजा साकारत आहे. त्यामुळे दीप (अर्जुन बिजलानी) आणि आरोही (अलिशा पंवार) यांच्या मधील चालू घडामोडीत एक प्रचंड बदल घडून येणार आहे.    
मेरी आशिकी तुमसे ही, साथ निभाना साथिया आणि सौभाग्यवती भव सारख्या अनेक मालिकांमध्ये आकांक्षा जुनेजाने काम केले असून तिच्या भूमिकांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तिने आजवर अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. आणि या नकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांशी नेहमीच चांगले नाते जोडले आहे. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वेदिका तिच्या नव्या पात्राद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. याविषयी बोलताना आकांक्षा जुनेजा उत्सुकतेने सांगते, “वेदिका ची भूमिका मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. या पात्राला अनेक छटा आहेत आणि आरोहीच्या दीप विरुद्धच्या सूडाच्या योजनेत तिचा हेतू काय आहे याचा अंदाज लावण्यात प्रेक्षक दंग होणार आहेत. या प्रवेशाने कथेमध्ये अनेक मोठ्या कलाटण्या येणार आहेत आणि मला खात्रीने वाटते आहे की, प्रेक्षक यात गुंतणार आहेत आणि लक्षवेधक निवेदनाने रोमांचित होणार आहेत.”
इश्क में मरजावा या मालिकेतील आकांक्षा जुनेजाची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल अशी आकांक्षाला खात्री आहे. 

Also Read : 'इश्क में मरजावा' मालिकेतील रहस्य कुलु मनाली येथे उलगडणार

Web Title: In the role of Akanksha Junja Ishq in MERJAVA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.