​रोहित रॉयने केला हा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 14:48 IST2018-03-19T09:18:26+5:302018-03-19T14:48:26+5:30

रोहित रॉयने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील खूप चांगल्या अभिनेत्यांपैकी एक त्याला मानले जाते. छोट्या ...

Rohit Royne banaya record | ​रोहित रॉयने केला हा विक्रम

​रोहित रॉयने केला हा विक्रम

हित रॉयने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील खूप चांगल्या अभिनेत्यांपैकी एक त्याला मानले जाते. छोट्या पडद्यानंतर आता रोनित एका वेगळ्या माध्यमाकडे वळला आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा एक कार्यक्रम प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाने सोशल नेटवर्किंगवर नुकताच एक रेकॉर्ड केला आहे. रोहित रॉय आयक्यू लाईव्ह या एका रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाची निर्माती प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा आहेत. या कार्यक्रमाने नुकताच एक रेकॉर्ड केलेला आहे. केवळ दोन दिवसांत म्हणजेच ४८ तासांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा अॅप डाऊनलोड केला आहे. 
आयक्यू लाईव्ह हा कार्यक्रम १२ मार्चला लाँच झाला. या कार्यक्रमाच्या विजेत्याला एक लाख रुपये मिळतात. त्यासाठी त्या स्पर्धकाला १२ प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतात. या कार्यक्रमाला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत रोहित रॉय सांगतो, लोकांनी या कार्यक्रमाला दिलेल्या प्रतिसादासाठी मी प्रचंड खूश आहे. या कार्यक्रमाचा फॉरमॅट आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचा मला आनंद होत आहे. या कार्यक्रमाच्या विजेत्यांना चांगला पैसा मिळत आहे. 
आयक्यू लाईव्ह या कार्यक्रमाचे निर्माते राज कुंद्रा सांगतात, या कार्यक्रमासारखेच कार्यक्रम भविष्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम सुरू असतानाच किती प्रेक्षक हा कार्यक्रम पाहात आहेत हे कळते. त्यामुळे जाहिरातदारांसाठी त्यांचे प्रोडक्ट अशा कार्यक्रमांमध्ये प्रोमोट करणे खूप सोपे जाते.
रोहितने आजवर स्वाभिमान, कभी कभी, बात बन जाये, कुसूम, भाभी, देस में निकला होगा चाँद यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काबिल, मित्तल व्हर्सेस मित्तल, कांटे, एलओसी कारगिल, देल्ही हाईट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच झलक दिखला जा, नल बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील तो झळकला आहे. तसेच त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. 


Web Title: Rohit Royne banaya record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.