बँकॉकमध्ये हरवला रिया शर्माचा पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 08:51 AM2018-02-22T08:51:40+5:302018-02-22T15:19:51+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेचे कलाकार अलीकडेच चित्रीकरणासाठी बँकॉकला गेले होते. मालिकेच्या कथानकानुसार, कनक (रिया शर्मा) ...

Riya Sharma's passport lost in Bangkok | बँकॉकमध्ये हरवला रिया शर्माचा पासपोर्ट

बँकॉकमध्ये हरवला रिया शर्माचा पासपोर्ट

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेचे कलाकार अलीकडेच चित्रीकरणासाठी बँकॉकला गेले होते. मालिकेच्या कथानकानुसार, कनक (रिया शर्मा) आणि उमाशंकर (अविनाश रेखी) हे बँकॉकला जाऊन मासी साचे (सादिया सिद्दिकी) कुटिल कारस्थान उघड करून उमाशंकरचे निर्दोषित्त्व सिध्द करतात. ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड असे म्हणतात; परंतु या मालिकेची नायिका रिया शर्मा हिच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही. सेटवरील एका विश्वासार्ह सूत्राने आम्हाला सांगितले की बँकॉकवरून परतताना रिया शर्माचा पासपोर्ट कुठेतरी गहाळ झाला. यामुळे साऱ्या युनिटची पंचाईत झाली. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर रियाला परतीचा तात्पुरता परवाना देण्यात आला. 

“माझा पासपोर्ट कुठेतरी हरविला होता. पण आमच्या टीमने प्रयत्नांनामुळे मला प्रवासाचा परवाना उपलब्ध करून दिला आणि मी भारतात परतू शकले, याबद्दल मी त्यांची खूपच आभारी आहे,” असे रिया शर्मा म्हणाली. रिया शर्मा आता सुखरूप भारतात परतली असून तिने मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभही केला आहे. 

तसेच या मालिकेत  सुंदर आणि चाणाक्ष सौंदर्यवती तारका कंगना शर्मा टीव्ही मालिकांमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील मदनमस्त तारका कंगनाने आता ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ या मालिकेत एका नकारात्मक भूमिकेसाठी कंगनाला करारबध्द करण्यात आले आहे.तिच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकाला नवे वळण लागणार असून कनक आणि उमाशंकरचे जीवन पालटून जाणार आहे.“टीव्ही मालिकेत मी प्रथमच भूमिका साकारणार असल्याने मला त्याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.या मालिकेसाठी करार केल्यानंतर मी ही मालिका नियमितपणे पाहात असून तिच्या चित्रीकरणाचा आम्ही लवकरच प्रारंभ करू.प्रेक्षकांना माझी भूमिका आणि माझं काम आवडेल, अशी आशा करते,” असे कंगना म्हणाली.

Web Title: Riya Sharma's passport lost in Bangkok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.