ऋत्विक धनजानी आणि त्रिधा चौधरी झळकणार 'अरेंज्ड'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 21:39 IST2022-03-25T21:38:58+5:302022-03-25T21:39:23+5:30
रितेश मेनन यांनी दिग्दर्शन केलेल्या या लघुपटामध्ये ऋत्विक धनजानी आणि त्रिधा चौधरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ऋत्विक धनजानी आणि त्रिधा चौधरी झळकणार 'अरेंज्ड'मध्ये
टेर्रिब्ली टायनी टेल्स निर्मित व रितेश मेनन दिग्दर्शित ऋत्विक धनजानी आणि त्रिधा चौधरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अरेंज्ड’ या लघुपटाचा प्रीमियर अमेझॉन मिनी टीव्ही ने घोषित केला आहे. हा लघुपट २५ मार्च रोजी अमेझॉन शॉपिंग अॅपवर असलेल्या अमेझॉन मिनी-टीव्हीवर मोफत प्रदर्शित होणार आहे.
‘अरेंज्ड’ ही रिचा (त्रिधा चौधरी) आणि तरुण (ऋत्विक धनजानी) या लग्न ठरवण्याच्या हेतूने पालकांसमवेत भेटलेल्या तरुणांची अत्यंत भिडणारी कथा आहे. एकमेकांशी संवाद साधत असतान त्यांना एकमेकांविषयीच्या अशा काही गोष्टी समजतात ज्या कहीतरी गूढ भासतात. यामुळे ते दोघे एकमेकांशी जोडले जातील की या नवीन माहितीने त्यांना धक्का बसेल? अशा अडचणींवर मात करत आणि अशाश्वततेतून मार्ग काढत आपले वाट चोखाळणाऱ्या भावी जोडीदारांवर ‘अरेंज्ड’ भाष्य करतो.
अॅमेझॉनचे जाहिरात प्रमुख गिरीष प्रभू म्हणाले, अरेंज्ड-ही एक अत्यंत रसपूर्ण आणि मनाला आनंद देणारा लघुपट आहे. जो ठरवून केलेल्या लग्नाविषयी अत्यंत सूचक भाष्य करतो.भारतभर असलेल्या अमेझॉनच्या ग्राहकांना हा लघुपट अमेझॉन शॉपिंग अॅपवर मोफत पहायला मिळेल आणि त्याचा आनंद घेता येईल.