'कुलस्वामिनी'तील सुवर्णाची वाढती लोकप्रियता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:33 IST2017-10-04T09:02:59+5:302017-10-04T14:33:13+5:30

कुठलीही मालिका लोकप्रिय झाली हे केव्हा ठरतं, जेव्हा त्यातील कलाकारांना मालिकेतील व्यक्तिरेखेच्या नावानं ओळखलं जातं. स्टार प्रवाहची 'कुलस्वामिनी' ही ...

The rising popularity of gold in Kalswamini | 'कुलस्वामिनी'तील सुवर्णाची वाढती लोकप्रियता

'कुलस्वामिनी'तील सुवर्णाची वाढती लोकप्रियता

ठलीही मालिका लोकप्रिय झाली हे केव्हा ठरतं, जेव्हा त्यातील कलाकारांना मालिकेतील व्यक्तिरेखेच्या नावानं ओळखलं जातं. स्टार प्रवाहची 'कुलस्वामिनी' ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. कारण, या मालिकेत खलनायिका असलेल्या अभिनेत्री किशोरी आंबिये यांना सुवर्णा या नावानंच प्रेक्षक ओळखू लागले आहेत. किशोरीताईंने शेअर केले असे तीन मजेदार किस्से. एअरपोर्ट पासून ब्युटी पार्लरमध्येही त्यांना सुवर्णा हीच ओळख मिळाली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात महिलांनी त्यांना अक्षरश: गराडा घातला.
नवरात्रीतल्या अष्टमीच्या निमित्ताने किशोरीताई कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात गेल्या होत्या. तिथं गेल्यावर काही महिलांनी त्यांना ओळखलं. 'तुम्ही काळी जादू करता, तर देवळात कशा? असा चमत्कारिक प्रश्नही विचारले. तर काही महिलांनी सुवर्णा काकू म्हणत त्यांच्याशी आपलेपणानं संवाद साधला. 'कुलस्वामिनी' मालिका आवडत असल्याचं आवर्जून सांगितलं. मंदिराच्या विश्वस्तांनीही कुलस्वामिनी मालिकेच्या टीमला मंदिरात घेऊन येण्याचं निमंत्रणही दिलं.

काही दिवसांपूर्वी किशोरी आंबिये गोव्याला गेल्या होत्या. गोव्याहून परत येताना एअरपोर्टवर त्या बोर्डिंग पास घ्यायला गेल्या. त्यापूर्वी त्यांनी त्याचं सामान सिक्युरिटी चेकसाठी दिलं. त्यावेळी तिथं असलेल्या अंटेडंटनं त्यांना सुवर्णा म्हणून हाक मारली. इतकंच नाही, त्यांच्याबरोबर सेल्फी घेतला.'तुम्ही आरोहीला एवढा त्रास का देता?' असंही विचारलं. इतकंच नाही, तर एका एअर होस्टेसनं त्यांना मालिकेतली त्यांची केस उडवण्याची स्टाईल करून दाखवली आणि त्यांनाही करून दाखवायला लावली.

असाच किस्सा त्या मुंबईतल्या ब्युटी पार्लरमध्ये असतानाही घडला. त्यांच्या शेजारच्या खुर्चीत असलेल्या बाईनं त्यांना सुवर्णा म्हणून हाक मारली. एक क्षण त्यांना कळलंच नाही. मात्र, त्यांच्या स्टायलिस्टनं त्यांना सांगितलं, की त्या बाई तु्म्हाला हाक मारतायत. त्यानंतर त्यां दोघींमध्ये मालिका आणि व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने गप्पाही रंगल्या. कुलस्वामिनी ही मालिका एकदम वेगळी असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

'कुलस्वामिनी' मालिका आणि सुवर्णा या व्यक्तिरेखेच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी आनंद व्यक्त केला. 'अभिनेत्री म्हणून मला व्यक्तिरेखेच्या नावानं हाक मारली जाणं, ओळखणं खूप महत्त्वाचं वाटतं. वेगवेगळ्या वयोगटातले प्रेक्षक ही मालिका पाहतात, त्यांना ती आवडते हे कळल्यावर आनंद झाला. सुवर्णा या व्यक्तिरेखेला मिळणारा प्रतिसादानं मी खूप खूश आहे,' असं त्यांनी सांगितलं.

Web Title: The rising popularity of gold in Kalswamini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.