रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट दिसणार मेकअपशिवाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 14:05 IST2017-08-07T08:35:28+5:302017-08-07T14:05:28+5:30

रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रणित हा खलनायकाच्या भूमिकांसाठीच ओळखला जातो. ...

Rishto Ka Chakravyuh In this series Pranit Bhatt will appear without makeup | रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट दिसणार मेकअपशिवाय

रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट दिसणार मेकअपशिवाय

श्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रणित हा खलनायकाच्या भूमिकांसाठीच ओळखला जातो. या मालिकेत देखील तो प्रेक्षकांना खलनायकाच्या भूमिकेतच दिसणार आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी प्रणित सध्या खूपच मेहनत घेत आहे. या भूमिकेतील प्रत्येक बारकाव्यांवर तो अभ्यास करत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एका कुटुंबातील कथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या कथानकानुसारच आपण मेकअप केला पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तो या मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी कमीत कमी मेकअप करत आहे. 
आजच्या काळात सगळे अभिनेते, अभिनेत्री या मेकअपच्या प्रेमात असतात. मेकअप केल्याशिवाय ते घरातून बाहेर पडण्याचा विचार देखील करत नाहीत. पण या सगळ्यांमध्ये प्रणित हा अपवाद आहे. प्रणितला नैसर्गिक सौंदर्यावर अधिक विश्वास आहे. त्यामुळे तो शक्य असल्यास मेकअप करणे टाळतो. त्यामुळे रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत तो केवळ पावडर आणि काजळ एवढाच मेकअप करत आहे. 
रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणितसोबतच नारायणी शास्त्री, संगीता घोष, महिमा मकवाणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर महिमा मकवाणा अनामी ही भूमिका साकारणार आहे. महिमा एक आनंदी, खेळकर मुलगी आहे. मात्र या 17 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील काही रहस्य कळल्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. देस में निकला होगा चाँद फेम संगीता घोष या मालिकेत सुधा ही भूमिका साकारणार असून या भूमिकेला नकारात्मक छटा आहे. 

Also Read : चक्रव्यूह या मालिकेच्या सेटवर महिमा मकवाणाला झाला अपघात

Web Title: Rishto Ka Chakravyuh In this series Pranit Bhatt will appear without makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.