रिनाने शिकली पंजाबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:26 IST2016-06-03T11:56:17+5:302016-06-03T17:26:17+5:30

वो रहने वाली महेलो की फेम रिना कपूर शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत ...

Rinnana learned Punjabi | रिनाने शिकली पंजाबी

रिनाने शिकली पंजाबी

रहने वाली महेलो की फेम रिना कपूर शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेचे कथानक आवडल्यामुळे तिने ही मालिका स्वीकारली असल्याचे ती सांगते. या मालिकेची कथा एकाच कुटुंबातील दोन मुलींची आहे. या मुली एकाच घरातील असूनही त्या दोघींना वेगवेगळ्या पद्धतीने वागवले जाते. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे घरातील सगळे मोठ्या मुलीचा राग करतात. पण या सगळ्यात तिची आई तिच्या पाठीशी उभी राहते. मोठ्या मुलीशी कोणी चांगले वागत नसल्याने ती नेहमीच तिचे संरक्षण करते. तर दुसरीकडे ती लहान मुलीकडे दुर्लक्ष करते. रिना स्वतः पंजाबी असून या मालिकेतही ती एका पंजाबी स्त्रीचीच भूमिका साकारत आहे. रिनाचे वडील हे नेव्हीत असल्याने ती भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी लहानाची मोठी झाली आहे. या सगळ्यामुळे ती पंजाबमध्ये न राहिल्याने पंजाबी असूनही तिला तितके चांगले पंजाबी बोलता येत नाही. या मालिकेत तिला पंजाबी बोलणे आवश्यक असल्याने तिने यासाठी तिच्या घरातल्यांकडून पंजाबी शिकल्याचे ती सांगते. या मालिकेत दोन लहान मुली दाखवल्या आहेत. या दोघींसोबत कसा वेळ जाते हेच कळत नाही, .या दोघींमुळे मी या मालिकेचे चित्रीकरण खूप एन्जॉय करत आहे असे रिना सांगते.  

Web Title: Rinnana learned Punjabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.