​सलमान खानसोबत ट्युबलाइटमध्ये झळकला आहे रिकी पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 17:50 IST2017-06-13T12:20:43+5:302017-06-13T17:50:43+5:30

रिकी पटेलने दिया और बाती हम या मालिकेत तर जोधा अकबर या चित्रपटात काम केले आहे. तो आता इंतेकाम ...

Ricky Patel is seen in TubLight with Salman Khan | ​सलमान खानसोबत ट्युबलाइटमध्ये झळकला आहे रिकी पटेल

​सलमान खानसोबत ट्युबलाइटमध्ये झळकला आहे रिकी पटेल

की पटेलने दिया और बाती हम या मालिकेत तर जोधा अकबर या चित्रपटात काम केले आहे. तो आता इंतेकाम एक मासूम का या आगामी मालिकेत झळकणार आहे आणि विशेष म्हणजे सलमानच्या ट्युबलाइट या चित्रपटात तो एका भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
रिकी सलमानचा मोठा चाहता आहे. त्याला सलमानचा अभिनय, त्याची सिग्नेचर स्टेप, त्याच्या चित्रपटातील संवाद सगळे काही खूपच आवडते. त्याला सलमानची नक्कलही करता येते. सलमानसोबत काम करायला मिळाले असल्याने तो सध्या खूपच खूश आहे. त्याने सलमानसोबतचे फॅन मूमेंट्स नुकतेच शेअर केले आहे. 
ट्युबलाइट या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी रिकी पहिल्यांदा ज्यावेळी सलमानला भेटला त्यावेळी तो खूपच खूश झाला होता. त्याला झालेला आनंद तो शब्दांत मांडू शकत नाही असे तो सांगतो. सलमानसोबत चित्रीकरणाची संधी मिळाल्याने तो खूपच उत्साहित होता. त्याने फ्रिकी अली या चित्रपटातील चड्डी डायलॉग सलमानला पहिल्या भेटीत म्हणून दाखवला. त्याचा हा संवाद ऐकून सलमान खूप प्रभावित झाला होता. त्याने रिकीला पुन्हा संवाद म्हणायला सांगितला आणि त्याचा परफॉर्मन्स कॅमेरामॅनला शूट करायला सांगितला आणि हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रिकी सांगतो, मी सलमानचा चाहता असल्याने मी त्याच्यासमोर परफॉर्म करायचे ठरवले. मी सलमान सरांना पहिल्याच दिवशी संवाद म्हणून दाखवले. त्यांना ते खूपच आवडले आणि त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मला यामुळे खूपच आनंद झाला. 

Web Title: Ricky Patel is seen in TubLight with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.