'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम समय शहा SSC Result 82% मिळवले गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 18:06 IST2017-06-14T12:36:28+5:302017-06-14T18:06:28+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत गोगी सोढीची भूमिका साकारणार समय शहा यंदा दाहावीत होता. या परिक्षेतही समयने बाजी ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम समय शहा SSC Result 82% मिळवले गुण
' ;तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत गोगी सोढीची भूमिका साकारणार समय शहा यंदा दाहावीत होता. या परिक्षेतही समयने बाजी मारत 82% गुण मिळवले आहेत. मालिकेतही गोगी अर्थात समय दहावीचा विद्यार्थी असल्याचे दाखवण्यात येत होते.दाहीवीचे वर्ष म्हटल्यावर गोगी आभ्यासात हुशार नसल्यामुळे बरेच टेंशन यायचे असा गोगी दाखवण्यात आला होता. मात्र ख-या आयुष्यात गोगी खूप हुशार आणि टॅलेंटेड मुलगा आहे. दहावीचा निकाल कळताच गोगीच्या सहकलाकरांनी त्यांच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले. त्याच्या कुटुंबाप्रमाणेच त्याच्या सहकलाकरांना गोगीचा या निकालाचा आनंद झाला होता. त्याचे तोंड गोड करण्यासाठी खास पेढे घेऊन कलाकारांनी त्याला सरप्राईज दिले होते. विशेष म्हणजे दहावीचे वर्ष असतानाही गोगीने मालिकेचे शूटिंग सुरुच ठेवले होते. सेटवरच तो अभ्यास करायचा. गोगी त्याच्या अभ्यासात कुठेही डिस्टर्ब होणार नाही याची काळजीही मालिकेच्या सेटवर घेतली जायची. अभ्यासात जास्त वेळ मिळावा म्हणून त्याचे काही भागही कमी करण्यात आले होते. गोगी आज आपल्या सगळ्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मालिकेच्या टीम द्यायलाही विसरत नाही. आता गोगी म्हणजेच समयला एमबीए करण्याची इच्छा आहे पुढे खूप शिकण्याची इच्छा असली तरी अभिनय हे त्याचे पहिले प्रेम असल्याचे तो सांगतो. त्यामुळे अभिनय करत राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.