रिप्लेसमेंट नव्हे नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 17:25 IST2016-05-30T11:55:40+5:302016-05-30T17:25:40+5:30

संजीदा शेखने दोन वर्षांपूर्वी एक हसिना थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने साकारलेली दुर्गा ठाकूर ही ...

Replacement not new role | रिप्लेसमेंट नव्हे नवी भूमिका

रिप्लेसमेंट नव्हे नवी भूमिका

जीदा शेखने दोन वर्षांपूर्वी एक हसिना थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने साकारलेली दुर्गा ठाकूर ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर तिने गेल्या दोन वर्षांत एकही मालिका केलेली नाही. दरम्यान ती पॉवर कपल या रिएलिटी शोमध्ये पती आमिर अलीसोबत झळकली होती. ती आता इश्क का रंग सफेद या मालिकेत धानीची भूमिका साकारणार आहे. आजकाल अनेक कलाकार छोट्या पडद्यावर येत असतात. त्यांची एखादी मालिका लोकप्रिय होते आणि त्यानंतर लोक त्यांना विसरून जातात. माझ्याबाबतीत असे काहीही झाले नाही यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असे संजीदा सांगते. एक हसिना थी या मालिकेनंतर आराम करायचा असा विचार केल्याने तिने काही महिने ब्रेक घेतला होता. त्या दरम्यान तिने केवळ एक रिएलिटी शो केला. इश्क का रंग सफेद या मालिकेचा प्रोमो आला, तेव्हाच ही मालिका तिला खूप इंटरेस्टिंग वाटली होती. त्यामुळे या मालिकेची ऑफर आल्यावर लगेचच ही मालिका तिने स्वीकारली असे ती सांगते. या मालिकेत धानी ही भूमिका आधी इशा सिंग ही अभिनेत्री साकारत होती. संजीता तिला या मालिकेत रिप्लेस करत आहे याचे तिला द़डपण आले आहे का असे विचारले असता ती सांगते, मी कोणालाही रिप्लेस करत आहे असा मी विचारच करत नाही. मी नव्याने एखादी भूमिका साकारत आहे असाच मी सध्या विचार करत आहे आणि माझ्या फॅन्सना माझी ही भूमिका आवडेल याची मला खात्री आहे. संजीदाने दोन दिवसांपूर्वी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या मालिकेची टीम खूप चांगली असून सगळे तिला खूप समजून घेतात असे ती सांगते. 

Web Title: Replacement not new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.