​रेणुका शहाणे अनेक वर्षांनंतर या मालिकेद्वारे परतणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 12:03 IST2017-11-14T06:33:00+5:302017-11-14T12:03:00+5:30

रेणुका शहाणेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सर्कस, सुरभी, सैलाब यांसारख्या तिच्या कार्यक्रमांची तर ...

Renuka Shahane will be returning to this series on a small screen after many years | ​रेणुका शहाणे अनेक वर्षांनंतर या मालिकेद्वारे परतणार छोट्या पडद्यावर

​रेणुका शहाणे अनेक वर्षांनंतर या मालिकेद्वारे परतणार छोट्या पडद्यावर

णुका शहाणेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सर्कस, सुरभी, सैलाब यांसारख्या तिच्या कार्यक्रमांची तर चांगलीच चर्चा झाली होती. रेणुका गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. कोणत्याच हिंदी मालिकेत तिने अनेक वर्षांत काम केलेले नाही. पण आता ती छोट्या पडद्यावर परतत आहे आणि छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना तिचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. खिचडी या मालिकेत ती प्रेक्षकांना दिसणार असून ती या मालिकेतील तिच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. 
खिचडी ही मालिका पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि स्वत: जे. डी. मजेडिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. खिचडी या मालिकेत आता रेणुकासोबत आणखी काही नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पीओडब्ल्यू’ मालिकेतील समीक्षा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दिल तो पागल है या मालिकेत झळकलेल्या बलविंदर सिंगची या मालिकेत एंट्री होणार आहे. बलविंदर आणि समीक्षा आपल्याला परमिंदर कुटुंबातील सदस्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निर्माते आतिश कपाडिया यांचा मुलगा अगस्त्या आणि जेडी मजेठीया यांची मुलगी मिश्री या मालिकेत जॅकी आणि चक्की या भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 
खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असल्याने या मालिकेचे फॅन्स प्रचंड खूश आहेत. 

Also Read : ​दिल तो पागल है या चित्रपटातील ​बलविंदर सिंग झळकणार खिचडी या मालिकेत

Web Title: Renuka Shahane will be returning to this series on a small screen after many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.