या कारणामुळे आमिर खान कधीच गेला नाही कपिल शर्मा शोमध्ये, पहिल्यांदाच समोर आले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 18:16 IST2020-05-18T18:05:39+5:302020-05-18T18:16:21+5:30
सलमान 'कपिल शर्मा शो'चा निर्माता देखील आहे.

या कारणामुळे आमिर खान कधीच गेला नाही कपिल शर्मा शोमध्ये, पहिल्यांदाच समोर आले कारण
द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेकजण या कार्यक्रमात आजवर येऊन गेले आहेत. आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर प्रत्येक कलाकारांची पहिली पसंत ही द कपिल शर्मा शो हीच असते.
द कपिल शर्मा शोमध्ये येण्याची इच्छा अनेक कलाकारांची, क्रिकेटरची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही. कपिलच्या शो मध्ये आजवर अनेकवेळा शाहरुख खान आणि सलमान खान यांना आपल्याला पाहायला मिळाले आहे. सलमान तर आता या कार्यक्रमाचा निर्माता देखील आहे. पण खानांच्या तिकडीतील आमिर खान कधीच द कपिल शर्मा शो मध्ये आजवर आलेला नाही. अनेक कलाकार आपल्या चित्रपटांचे मालिका अथवा कार्यक्रमाद्वारे प्रमोशन करत असतात. पण यासाठी आमिर खान हा अपवाद ठरतो.
राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार आमिरला कपिलच्या शोमध्ये जाणं पसंत नाही. या शोमध्ये अनेक वेळा कपिल महिलांवर विनोद करतो. अनेक वेळा स्टार्सची ही खिल्ली उडवली जाते.