या कारणामुळे सौरव गुर्जरने साकारली पृथ्वी वल्लभ या मालिकेतील भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 13:37 IST2018-02-08T08:07:06+5:302018-02-08T13:37:06+5:30

पृथ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. ...

For this reason, the role played by Sourav Gurjar came in the role of Prithvi Vallabh | या कारणामुळे सौरव गुर्जरने साकारली पृथ्वी वल्लभ या मालिकेतील भूमिका

या कारणामुळे सौरव गुर्जरने साकारली पृथ्वी वल्लभ या मालिकेतील भूमिका

थ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. या मालिकेची कथा युद्धभूमीतल्या द्वेषापासून सुरू झाली असून त्यात एक प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिके मध्ये आशिष शर्मा, सोनारिका भदोरिया, पवन चोप्रा, शालिनी कपूर, अलेफिया कपाडिया, जतिन गुलाटी, पियाली मुंशी, सुरेंद्र पाल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पृथ्वी वल्लभ या मालिकेसाठी सध्या आशिष शर्मा प्रचंड मेहनत घेत आहे. 
पृथ्वी वल्लभ या मालिकेत राजा गोहिलच्या भूमिकेत प्रेक्षकांना सौरव गुर्जरला पाहायला मिळत आहे. सौरव हा प्रसिद्ध कुस्तापट्टू असून वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेंमेंट मध्ये लवकरच तो पदार्पण करणार आहे. या मालिकेत काम करण्याविषयी सौरव सांगतो, मला या मालिकेबाबत सुरूवातीला विचारण्यात आले, तेव्हा या मालिकेत काम करण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती. कारण मी WWE च्या परीक्षणांमध्ये गुंतलो होतो. कुस्तीच ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे. पण मी जेव्हा या मालिकेची पटकथा वाचली, तेव्हा या व्यक्तिरेखेने मी खूप अचंबित झालो. राजा गोहिलची भूमिका दमदार आहे. तो निर्भीड आहे आणि आसपासच्या लोकांत त्याचा दरारा आहे. ही व्यक्तिरेखा आणि माझे व्यक्तिमत्व यात मला बरेचसे साम्य आढळले आणि या कारणामुळे मी या मालिकेत काम करण्यास होकार दिला. मला या व्यक्तिरेखेसाठी काही खास प्रशिक्षण घ्यावे लागले नाही. मी अमेरिकेत WWE च्या केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्या वेळी मला उत्तम प्रशिक्षण मिळाले होते, जे खास करून शारीरिक फिटनेससाठी उपयुक्त असते. मी जिमपेक्षा आऊटडोर व्यायाम करतो. माझा खास भर स्टॅमिना आणि ताकद वाढविण्यावर असतो. त्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी माझे शरीर हे चांगलेच फिट आहे. 
सौरव गुर्जरने आजवर महाभारत, संकचमोचन महाबली हनुमान या मालिकेत काम केले आहे. महाभारत या मालिकेत तिने साकारलेल्या भीमाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच संकचमोचन महाबली हनुमान या मालिकेत सुरुवातीच्या काळात आर्या बब्बर रावणाची भूमिका साकारत होता. पण त्याची जागा सौरवने घेतली होती. सौरवच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. 

Also Read : ​पृथ्वी वल्लभ या मालिकेत आशिष शर्मा आणि सौरव गुर्जरवर चित्रीत करण्यात आले हे कठीण दृश्य

 

Web Title: For this reason, the role played by Sourav Gurjar came in the role of Prithvi Vallabh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.