​या कारणामुळे किरण कुमार झाले मालिकेतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:59 IST2016-12-12T17:59:47+5:302016-12-12T17:59:47+5:30

एखादी व्यक्तिरेखा काही महिन्यांसाठी मालिकेत दिसली नाही की, कलाकाराने त्या मालिकेला रामराम ठोकला का असा प्रश्न प्रेक्षकांना पडू लागतो. ...

For this reason, Kiran Kumar disappeared from the series | ​या कारणामुळे किरण कुमार झाले मालिकेतून गायब

​या कारणामुळे किरण कुमार झाले मालिकेतून गायब

ादी व्यक्तिरेखा काही महिन्यांसाठी मालिकेत दिसली नाही की, कलाकाराने त्या मालिकेला रामराम ठोकला का असा प्रश्न प्रेक्षकांना पडू लागतो. संयुक्त या मालिकेतून गेल्या काही दिवसांपासून गोवर्धन मेहता ही व्यक्तिरेखा गायब आहे. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी देवाची प्रार्थना करण्यासाठी गोवर्धन आश्रमात गेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोवर्धनची भूमिका साकारणाऱ्या किरण कुमार यांनी ही मालिका सोडली का अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. पण त्यांना गेल्या काही दिवसांपासून बरे नसल्याने मालिकेचे चित्रीकरण करणे त्यांना शक्य नाहीये आणि त्याचमुळे मालिकेच्या कथानकाला हे वेगळे वळण देण्यात आले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून किरण कुमार यांची तब्येत खालावली आहे. त्यांना जवळजवळ महिन्याभरापासून ताप आहे. सुरुवातीला या अवस्थेतदेखील ते काही दिवस चित्रीकरण करत होते. पण तापच उतरत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही तपासण्या केल्या. त्यात त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यापासून ते चित्रीकरण करत नाहीत. तापामुळे अशक्तपणा आला असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी किरण यांना मालिकेत पाहाता येणार नाहीये. या मालिकेच्या टीममधील एका व्यक्तीने सांगितले, "किरण कुमार यांना डेंग्यू झाल्याने ते काही दिवसांपासून चित्रीकरण करत नाहीयेत. त्यामुळे आम्ही सगळेच त्यांना सेटवर खूप मिस करत आहोत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे अशी आम्ही सगळेच देवाकडे प्रार्थना करत आहोत."

Web Title: For this reason, Kiran Kumar disappeared from the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.