या कारणांमुळेच अनवानी फिरतो अभिनेता विवेक मुश्रन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 15:55 IST2017-03-29T09:23:15+5:302017-03-29T15:55:50+5:30
‘एक आस्था ऐसी भी’ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. निव्वळ धार्मिक कर्मकांडांपेक्षा मानवसेवा ही अधिक ...
या कारणांमुळेच अनवानी फिरतो अभिनेता विवेक मुश्रन
‘ क आस्था ऐसी भी’ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. निव्वळ धार्मिक कर्मकांडांपेक्षा मानवसेवा ही अधिक महत्त्वाची आणि श्रेष्ठ आहे, असे मानणा-या आस्था या निरागस आणि नि:स्वार्थी मुलीची कथा यात सादर करण्यात आली आहे. आस्थाची भूमिका टिना फिलिप या नवख्या अभिनेत्रीने साकार केलेली असली, तरी या मालिकेत विवेक मुश्रन, मानसी साळवी आणि कन्वर धिल्लाँ यासारखे ज्येष्ठ कलाकार महत्त्वाच्या भूमिका रंगविणार आहेत.विवेक मुश्रन यात गोविंद अगरवाल पुरोगामी विचारांच्या पतीची तसेच अतिशय व्यवहारी आणि वास्तववादी व्यक्तीची भूमिका रंगविणार आहे. तो या मालिकेच्या सेटवर अनवाणी पायांनी चित्रीकरण करतो, असे आमच्या कानावर आले आहे.यासंदर्भात विवेकने सांगितले, “या मालिकेच्या सेटवर अगरवाल यांच्या भव्य बंगल्याचा सेट उभारण्यात आला आहे. या बंगल्यात एक पूजा घर असून त्यात मंदिर आहे. त्या मंदिरात रोज सकाळी दिवा लावला जातो, मग आमचं चित्रीकरण असो की नसो. परंतु प्रत्यक्ष पूजाघरात जरी चित्रीकरण होत नसलं, तरी आम्ही सर्व त्या मंदिराच्या अवतीभवतीच वावरत असतो. त्यामुळे परमेशवरावरील आदरापोटी मी सेटवर अनवाणी पावलांनी वावरतो. मालिकेतल्या माझ्या कोणत्याही प्रसंगात तुम्हाला माझ्या पायात चपला-बूट दिसणार नाहीत.” ही एक वैशिष्ट्य़पूर्ण मालिका असून ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.