पुन्हा जमली भट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 12:45 IST2016-07-21T07:15:58+5:302016-07-21T12:45:58+5:30
नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. आबिगाईल पांडे या अभिनेत्रीचा या मालिकेत ...
पुन्हा जमली भट्टी
न गार्जुन - एक योद्धा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. आबिगाईल पांडे या अभिनेत्रीचा या मालिकेत लवकरच प्रवेश होणार असून ती या मालिकेत टीना ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. टीना ही अतिशय बडबडी असून आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगणारी आहे. तिच्यामुळे अर्जुन आणि नूरी यांच्यात काहीसा दुरावा निर्माण होणार आहे. आबिगाईल पांडेने या आधी अंशुमान मल्होत्रा, मृणाल जैन यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. सासू-सूनेच्या भांडणांवर आधारित असलेल्या मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी असल्याने मी ती स्वीकारली असे आबिगाईल पांडे सांगते.