​रत्ना पाठक शाह खिचडीमध्ये साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:26 IST2017-12-27T08:56:49+5:302017-12-27T14:26:49+5:30

लोकप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शाह म्हणजेच साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील माया साराभाई आता स्टार प्लसवरील आगामी शो खिचडीमध्ये ...

Ratna Pathak plays the role of realizing Shah Khichadi | ​रत्ना पाठक शाह खिचडीमध्ये साकारणार ही भूमिका

​रत्ना पाठक शाह खिचडीमध्ये साकारणार ही भूमिका

कप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शाह म्हणजेच साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील माया साराभाई आता स्टार प्लसवरील आगामी शो खिचडीमध्ये आपल्याला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रत्ना या मालिकेत आपली आई दिवंगत अभिनेत्री दिना पाठक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दिना पाठक यांनी खिचडीमध्ये बा ची भूमिका साकारली होती. पण २००० मध्ये दिना पाठक यांचे निधन झाले. 
आता काहीच दिवसांत खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत प्रेक्षकांना रत्ना पाठक बा ची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत हंसाची भूमिका साकारणारी सुप्रिया पाठक ही रत्ना पाठकची सख्खी बहीण आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही बहिणींना या मालिकेत एकत्र पाहायला मिळणार आहे. याविषयी या मालिकेचे निर्माते जे. डी. मजेठिया सांगतात, “दिना पाठक आणि सुप्रिया पाठक या सुरुवातीपासून या मालिकेचा हिस्सा आहेत. आता बा च्या भूमिकेत प्रेक्षकांना रत्ना पाठक यांना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेत त्या कशा वाटतात हे पाहायला आम्ही उत्सुक आहोत.”

dina pathak

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक, जे. डी. मजेठिया तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सुप्रिया पाठक यांनी आजवर कलयुग, विजेता, सरकार, ऑल इज वेल, गलियों की रासलीला राम लीला यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

Also Read : रेणुका शहाणे सांगतेय सुप्रिया पाठक माझ्या ऑल टाईम फेव्हरेट लेडी डॉन

Web Title: Ratna Pathak plays the role of realizing Shah Khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.