रसिका सुनील आणि आदित्य बिलागीच्या रिलेशनशीपला एक वर्षे पूर्ण, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 18:42 IST2021-01-23T18:41:43+5:302021-01-23T18:42:06+5:30

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते.

Rasika Sunil and Aditya Bilagi's relationship lasted for one year, she revealed | रसिका सुनील आणि आदित्य बिलागीच्या रिलेशनशीपला एक वर्षे पूर्ण, खुद्द तिनेच केला खुलासा

रसिका सुनील आणि आदित्य बिलागीच्या रिलेशनशीपला एक वर्षे पूर्ण, खुद्द तिनेच केला खुलासा

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता नुकतेच रसिकाने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

रसिका सुनीलने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत म्हटले की, अनपेक्षितपणे जानेवारी २०२०मध्ये प्रेमात पडले. लाँग डिस्टन्स नाते आहे. अखेर दहा वर्षानंतर आदित्य बिलागीला पाहू शकले. मला माहित आहे मी इथे आल्यापासून आम्ही भावनांच्या रोलर कोस्टरमधून गेलो आहोत. मग आजी आम्हाला सोडून गेली. त्यानंतर आम्ही दोघे आजारी पडलो. प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत होते तर सर्व क्षण तुझ्यापासून लांब आहे. तू नकळत मला दररोज तुझ्याबद्दल आदर आणि प्रेम करण्याची लाखो कारणे दिली आहेस. आपल्या या मोहक प्रवासाला एक वर्षेदेखील झाले. इतके छान प्रेमळ वर्धापनादिन नियोजित केल्याबद्दल धन्यावाद.


काही दिवसांपूर्वी रसिकाने आदित्यसोबतच्या नात्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे कबूल केले आहे.

तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.

Web Title: Rasika Sunil and Aditya Bilagi's relationship lasted for one year, she revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.