राणी मुखर्जीला भावला तमन्नाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 10:27 IST2018-03-30T04:57:21+5:302018-03-30T10:27:21+5:30

‘झी टीव्ही’वरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या गुणी बालनर्तकांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने प्रेक्षकांना गेले अनेक आठवडे मंत्रमुग्ध करून सोडले ...

Rani Mukherjee's Prologh Tamanna Style | राणी मुखर्जीला भावला तमन्नाचा अंदाज

राणी मुखर्जीला भावला तमन्नाचा अंदाज

ी टीव्ही’वरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या गुणी बालनर्तकांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने प्रेक्षकांना गेले अनेक आठवडे मंत्रमुग्ध करून सोडले आहे. या आठवड्यात नामवंत अभिनेत्री राणी मुखर्जी ही आपल्या ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने प्रेक्षकांना काही सुंदर नृत्ये पाहायला मिळतील. आदिरा या आपल्या सुंदर मुलीच्या जन्मानंतर राणी मुखर्जीने सांगितले की तिला लहान मुले फार आवडतात. ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या गुणी बालनर्तकांच्या नृत्यात गुंगून गेलेल्या राणी मुखर्जीकडे पाहून तिची ही भावना खरीच असल्याचे लक्षात येत होते. या कार्यक्रमात सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट नृत्ये सादर केली असली तरी आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि सहसूत्रधार जय भानुशाली याच्याबरोबर केलेल्या खुसखुशीत टिप्पणीने सूत्रधार तमन्नाने राणी मुखर्जीला चांगलेच प्रभावित केले. इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ या कार्यक्रमात स्पर्धक असल्यापासूनच तमन्ना आपला भावदर्शी चेहरा आणि नाट्यपूर्ण कृतींनी परीक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे. या कार्यक3माच्या संपूर्म चित्रीकरणादरम्यान राणी मुखर्जीवर तमन्नाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत होते. राणी म्हणाली, “मी आतापर्यंत अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून बर्‍्याच पुरस्कार वितरण समारंभांमध्ये उपस्थित राहिले आहे. पण तमन्नासारखी प्रामाणिक आणि उत्तम सूत्रधार मला कुठेच आढळली नाही. या संपूर्ण कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान मी तिला पाहात होते आणि आता मी तिची पहिल्या क्रमांकाची चाहती बनले आहे.” किंबहुना चित्रीकरण संपल्यावर जाण्यापूर्वी राणीने तमन्नाची मुद्दाम भेट घेतली आणि तिच्याबरोबर काही छायाचित्रेही काढली. जाताना तिने तमन्नाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यावर तमन्ना भारावून गेली. येत्या वीकेण्डला ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमातील ब्लॉकबस्टर बच्चे नर्तक हे प्रसिध्द अभिनेत्री राणी मुखर्जीला आदरांजली वाहण्यासाठी ‘डिस्कोवाले खिसको’ गाण्यावर अफलातून नृत्य सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याशिवाय राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ आणि ‘साथिया’ या चित्रपटांतील ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘तेरा चेहरा जब नजर आए’, ‘मैं तुमको नहीं छोडूंगी’ या लोकप्रिय गाण्यांवर बीर शेर्पा, जीतूमोनी, वैष्णवी आणि तन्मय या स्पर्धकांनी रिले नृत्य सादर करून या आदरांजलीला उच्चस्तरावर नेले.

Web Title: Rani Mukherjee's Prologh Tamanna Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.