राणा आणि अंजली देणार गुडन्युज !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 07:19 AM2018-05-08T07:19:59+5:302018-05-08T12:49:59+5:30

टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार ...

Rana and Anjali to Gudduja! | राणा आणि अंजली देणार गुडन्युज !

राणा आणि अंजली देणार गुडन्युज !

googlenewsNext
आरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ती अगदी नकारात्मक व्यक्तीरेखा असलेली नंदिता वहिनी असो, ते सर्व महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. नुकतंच आपण मालिकेत पाहिलं कि गायकवाडांना त्यांचा वाडा परत मिळतो. हा आनंद साजरा करण्यासाठी वाड्यात मोठा समारंभ आयोजित केला जातो. गावकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
आबा गावातल्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे आभार मानतात आणि त्यांचे पैसे देखील परत करतात. सगळीकडे आनंदीआनंद वातावरण आहे. वाडा तर परत मिळाला पण आता जमीन परत मिळवण्याचे अतोनात प्रयत्न घरातील सदस्य करत आहेत.

सगळं सुरळीत पार पडतातआहेत, गोष्टी आधीसारख्या रुळावर येतात आहे त्यामुळे आबा आता राणा अंजलीला मुलाचा विचार करा असं सुचवतात. आबांनी अचानकपणे मुलाचा विषय काढल्याने राणा अंजली बावरतात. आपण या नव्या जबाबदारीसाठी तयार आहोत का हे दोघांनाही आत्ता कळत नाहीये. पण त्यांच्याकडे लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अंबानी सांगितल्याप्रमाणे राणा आणि अंजली खरंच बाळाचा विचार करणार आहेत का? हा नवा पाहुणा कोण असणार आहे? त्याच्या आगमनाने राणा आणि अंजलीच आयुष्य कशाप्रकारे बदलणार आहे? हे पाहणे खूपच रंजक ठरेल.

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका रसिकांमध्ये दिवसेंदिवस हिट ठरत आहे. मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईची केमिस्ट्री रसिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. चालतंय की म्हणत मनं जिंकणा-या राणा दा सोबत मालिकेतील शांत, संयमी आणि सोज्वळ अशा पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरसुद्धा लोकप्रिय ठरली आहे. 

Web Title: Rana and Anjali to Gudduja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.