राखीच्या सेक्रेटरींचे नावे सनी आणि लिओनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 20:38 IST2016-11-25T20:34:41+5:302016-11-25T20:38:13+5:30

राखी सावंत आणि सनी लिओनीचे नाव घेताच संंतापून जाते, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्या संतापाची सीमारेषा किती ...

Rakhi Secretariat's names Sunny and Leonie | राखीच्या सेक्रेटरींचे नावे सनी आणि लिओनी

राखीच्या सेक्रेटरींचे नावे सनी आणि लिओनी

खी सावंत आणि सनी लिओनीचे नाव घेताच संंतापून जाते, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्या संतापाची सीमारेषा किती आहे, याचा अंदाज बांधणे खरोखर कठीण आहे. राखीने सनीविषयीचा राग व्यक्त करण्यासाठी असा काही फॉर्म्युला शोधून काढला, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

त्याचे झाले असे की, राखी लवकरच ‘राखी इन खाकी’ या वेब सीरीजमध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये ती पोलीस आॅफिसरच्या भूमिकेत असून, तिचे दोन सेक्रेटरी देखील आहेत. राखीने या सेक्रेटरींचे नाव सनी आणि लिओनी असे ठेवले आहे. राग व्यक्त करण्याचा राखीचा हा फॉर्म्युला खरोखरच मजेशीर असून, सीरीजमध्ये ती कशा पद्धतीने सनी आणि लिओनीवर बरसणार हे येत्या काळात बघावयास मिळेलच. 

खरं तर सुरूवातीपासूनच राखीचा सनीबरोबचर छत्तीसचा आकडा आहे. सनीवर वार करण्याची एकही संधी राखी सोडत नाही. काही दिवसांपूर्वीच तिने सनीवर टीका करताना म्हटले होते की, सनीमुळेच तिला अन् तिच्यासारख्या मुलींना कमी कपडे घालण्यास भाग पाडले जात आहे. तिच्यामुळेच मला इंडस्ट्रीमध्ये बोल्ड रोल मिळत आहे. सनीने बॅग पॅककरून भारतातून लवकरच पळ काढायला हवा.

सनीला राखीच्या या वादग्रस्त वक्तव्यांचा काहीही फरक पडत नसताना दिसत आहे. त्यामुळेच आतापर्यंत सनीने तिच्या या टीकेला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. काहीही असो, एक मात्र खरे आहे की, या वेब सीरीजमध्ये राखी सनीचा किती तिरस्कार करते हे बघावयास मिळेल, हे नक्की! 

Web Title: Rakhi Secretariat's names Sunny and Leonie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.