राखी सावंतने फोटोग्राफर्सना सांगितले खोटे वय, नेटिझन्स म्हणतायेत दीदी तुम तो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 03:43 PM2021-03-27T15:43:35+5:302021-03-27T15:44:21+5:30

राखीने व्हिडिओत तिचे वय सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

rakhi sawant said i am 37 but wikipedia shows her age is 42 | राखी सावंतने फोटोग्राफर्सना सांगितले खोटे वय, नेटिझन्स म्हणतायेत दीदी तुम तो...

राखी सावंतने फोटोग्राफर्सना सांगितले खोटे वय, नेटिझन्स म्हणतायेत दीदी तुम तो...

googlenewsNext
ठळक मुद्देराखीला फोटोग्राफर विचारत आहेत की, 36 च का? त्यावर मी 16 ची वाटते का? असा प्रश्न ती फोटोग्राफर्सना विचारत आहे.

राखी सावंत नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असून बिग बॉसच्या घरात असताना तिने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. आता राखी नुकतीच पत्रकारांच्या समोर आली होती. यावेळी तिने तिच्या फिटनेसचे रहस्य त्यांना सांगितले आहे. एवढेच नव्हे तर तिचे वय देखील सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ज्यूसचा ग्लास हातात घेऊन राखी गाडीत बसताना दिसत आहे. त्याचवेळी फोटोग्राफर तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर ती त्यांना सांगत आहे की, तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुमच्या जीभेवर ताबा ठेवा...त्यावर तुला का बारीक व्हायचे आहे? असे फोटोग्राफर राखीला विचारत आहे तर यावर बारीक होणे गरजेचे आहे.... येथे लोक लवकरच विसरून जातात. त्यामुळे बारीक राहाणे, हॉट दिसणे गरजेचे असते. तसेच समाजसेवा करणे, चर्चेत राहाणे या गोष्टी देखील आवश्यक आहेत. 

यानंतर कोरोनो लसीबाबत राखी बोलताना दिसत आहे. राखी फोटोग्राफर्सना सांगत आहे की, 34-36 वर्षांच्या लोकांना देखील कोरोना लस द्या... मी नुकतेच ऐकले की 45 वर्षांच्या वरील लोकांना आता लस देणार आहेत. मग 36 वर्षांच्या आमच्यासारख्या लोकांचे काय होणार?

त्यावर राखीला फोटोग्राफर विचारत आहेत की, 36 च का? त्यावर मी 16 ची वाटते का? असा प्रश्न ती फोटोग्राफर्सना विचारत आहे. तसेच मी 37 वर्षांची आहे.... मी कशाला वय खोटे सांगू असे ती पुढे सांगत आहे. तसेच काही वजन कमी केले तर मी 18 ची वाटेन असे देखील ती बोलताना दिसत आहे.

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला तिच्या वयावरून ट्रोल केले जात आहे. कारण वीकिपीडियानुसार राखीचे वय 37 नव्हे तर 42 आहे. राखी वय लपवतेय असे तिला सोशल मीडियावर लोक सुनावत आहेत.  

Web Title: rakhi sawant said i am 37 but wikipedia shows her age is 42

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.