राखी रिअॅलिटी शोनंतर मालिकेकडे वळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 15:14 IST2016-10-22T15:14:45+5:302016-10-22T15:14:45+5:30
राखी सावंतने बिग बॉस, पती पत्नी और वो, राखी का स्वयंवर, कॉमेडी सर्कस यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला ...
.jpg)
राखी रिअॅलिटी शोनंतर मालिकेकडे वळली
र खी सावंतने बिग बॉस, पती पत्नी और वो, राखी का स्वयंवर, कॉमेडी सर्कस यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. या रिअॅलिटी शोंमुळे तिला खऱ्या अ्रथाने प्रसिद्धी मिळाली. तिने छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केले असले तरी ती कधीही कोणत्याही मालिकेत झळकली नाही. पण पहिल्यांदाच ती एका मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. साथ निभाना साथिया या मालिकेत ती दिसणार आहे. साथ निभाना साथिया ही मालिका अनेक वर्षं सुरू असून या मालिकेतील गोपी बहू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडते. या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी मोहम्मद नाजिमची रिएंट्री झाली आहे. मोहम्मद मालिकेत परत आल्यामुळे त्याचे फॅन्स चांगलेच खूश आहेत. मोहम्मदच्या एंट्रीनंतर मालिकेत आता एका धुवाधार एंट्री करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे आणि त्यासाठी त्यांनी राखी सावंतला संपर्क केला असल्याचे म्हटले जात आहे. मोहम्मद म्हणजेच जग्गी गोपीच्या प्रेमात असल्याचे आपल्याला माहीतच आहे. या दोघांच्या प्रेमकथेत अडथळा आणण्यासाठी राखीची एंट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत जग्गीसोबत राखीचे लग्न ठरणार आहे. सुरुवातीला तिची भूमिका ही सकारात्मक असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण काही भागांनंतर मोदी परिवारात वादळ निर्माण करण्याचे ती ती प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच मालिकेत एखादी व्यक्तिरेखा साकारण्यास राखी खूप उत्सुक असल्याचे कळतेय.
मालिकेत अभिनय करण्याची राखीची पहिलीच वेळ असली तरी मैं हू ना, दिल बोले हडिप्पा, एक कहानी ज्यूली की यांसारख्या चित्रपटात तिला अभिनय करताना आपण पाहिले आहे.
मालिकेत अभिनय करण्याची राखीची पहिलीच वेळ असली तरी मैं हू ना, दिल बोले हडिप्पा, एक कहानी ज्यूली की यांसारख्या चित्रपटात तिला अभिनय करताना आपण पाहिले आहे.