Rakhi Sawant Video : पतीवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेला भेटली राखी; म्हणाली, 'काय झालंय इंडियन पोलिसांना?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:47 AM2023-02-24T09:47:16+5:302023-02-24T09:48:47+5:30

राखी सावंत सध्या पती आदिलवर केलेल्या आरोपांमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Rakhi meets the victim who accused her husband of rape says what is wrong with indian police | Rakhi Sawant Video : पतीवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेला भेटली राखी; म्हणाली, 'काय झालंय इंडियन पोलिसांना?'

Rakhi Sawant Video : पतीवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेला भेटली राखी; म्हणाली, 'काय झालंय इंडियन पोलिसांना?'

googlenewsNext

Rakhi Sawant Video  : राखी सावंत सध्या पती आदिलवर केलेल्या आरोपांमुळे चांगलीच चर्चेत आहे. राखीच्या आयुष्यातील ड्रामा थांबण्याचे नावच घेत नाहीए. नुकतीच राखी म्हैसूरवरुन मुंबईत परत आली आहे. म्हैसूरला ती आदिलच्या घरी गेल्याचे तिने सांगितले. मात्र तिथे तिला सासू सासरे भेटले नाहीत असंही ती म्हणाली. इतकंच नाही तर आदिलवर बलात्काराचे आरोप केलेल्या पीडितेचीही तिने भेट घेतल्याचं सांगितलं आहे. याशिवाय आदिलवर कडक कारवाई का होत नाही असं म्हणत राखीने आता पोलिसांवरच नाराजी व्यक्त केली आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती सध्या तुरुंगात आहे. आदिलवर मारहाण, फसवणीक, बलात्कार, इतर मुलींशी संबंध असे अनेक आरोप लावण्यात आले आहेत. म्हैसूरवरुन परतल्यानंतर राखीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती म्हणाली ,' मी म्हैसूरमध्ये त्या पीडितेला भेटले तिने मला सगळे पुरावे दाखवले. हे सगळं फार धक्कादायक आहे माझी तब्येत अजुनच खराब झाली. कोर्टाबाहेर मला चक्कर आली. आदिल किती खोटं बोलतोय. त्याचे दोन फोन आहेत ते अजून पोलिसांना मिळालेले नाही. मुलींसोबत अश्लील कृत्य करताना त्याचे व्हिडिओ आहेत.कोणी असं कसं शूट करु शकतं. काय झालंय इंडियन पोलिसांना, काय झालंय ओशिवरा पोलिसांना का त्याच्याविरोधात कडक कारवाई होत नाही मला कळत नाही. दोन फोन नाही काढू शकत त्याचे. पोलिसांनी जनतेसोबत न्याय करतील अशी शपथ घेतली आहे. मी न्याय मागत आहे. चार दिवस नक्की काय चौकशी केली काय माहित. मी खूप नाराज झाले आहे.'

राखीच्या या  आरोपांनंतर ती सोशल मीडियावर आणखी ट्रोल होत आहे. केवळ प्रसिद्धीसाठी राखी ड्रामा करत असल्याने आता नेटकरीही संतापले आहेत. तर काही युझर मात्र राखीच्या दु:खात तिला सहानुभूती दर्शवत आहेत. दिवसेंदिवस राखीचा ड्रामा मात्र वाढतच चालला आहे. 

Web Title: Rakhi meets the victim who accused her husband of rape says what is wrong with indian police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.