‘राजा राणीची गं जोडी’मालिकेतील अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:03 IST2022-02-18T15:00:02+5:302022-02-18T15:03:12+5:30
Raja Rani Chi Ga Jodi : कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. याच मालिकेसंदर्भात एक बातमी आहे. होय, या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

‘राजा राणीची गं जोडी’मालिकेतील अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?
कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Rani Chi Ga Jodi) ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. संजू आणि रणजीतचा रोमॅन्टिक ट्रॅक सध्या मालिकेत सुरू आहे. याच मालिकेसंदर्भात एक बातमी आहे. होय, या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ही कोण तर अंकिता निक्रड (Ankita Nikrad). अंकिता या मालिकेत अपर्णाची भूमिका साकारतेय. नुकतंच तिचं केळवण साजरे करण्यात आलं.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता निक्रड आणि ज्ञानेश भुकेले यांच्या लग्नाची सुपारी फुटली होती. ज्ञानेश भुकेले हा मूळचा कोल्हापूरचा परंतु त्याचे कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे.
ज्ञानेश हा लेखक, पत्रकार आणि व्याख्याता म्हणून ओळखला जातो. ज्ञान मीडिया या संस्थेचा तो संस्थापक आहे. लवकरच या दोघांचं थाटात लग्न पार पडणार आहे.
अंकिताने दहावी नंतर 3 वर्षे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. शेवटच्या वर्षात शिकत असताना अंकिता नाटकांकळे वळली. अभिनयात ती इतकी रमली की,इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडत तिने पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला. इथूनच तिचा रंगभूमीवरचा खरा प्रवास सुरु झाला. तीन वर्षे नाट्यशास्त्र विषयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या लोककला विभागात तिने अॅडमिशन घेतले. सन मराठी या वाहिनीवरील सुंदरी या आणखी एका मालिकेत अंकिता महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय.