'राजा राणीची गं' जोडी मालिका निर्णायक वळणावर, भर सभेमध्ये होणार कुसुमावतींचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:18 PM2022-05-27T17:18:50+5:302022-05-27T18:34:46+5:30

राजा रानीची गं जोडी या मालिकेला आजवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता मालिका निर्णायक वळणावर येणार आहे.

raja rani chi ga jodi serial Kusumavati's murder at Ranjit's rally | 'राजा राणीची गं' जोडी मालिका निर्णायक वळणावर, भर सभेमध्ये होणार कुसुमावतींचा खून

'राजा राणीची गं' जोडी मालिका निर्णायक वळणावर, भर सभेमध्ये होणार कुसुमावतींचा खून

googlenewsNext

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेला आजवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. संजू – रणजितची जोडी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी ठरली असं म्हणायला हरकत नाही. ज्या गोष्टीची प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते ती आता घडणार आहे. जो कायदा तोडणार, त्याला रणजित फोडणार... हो ! कारण, ACP रणजित ढाले पाटील यांचे आगमन पुन्हाएकदा होणार आहे. गुन्हेगारीला रोखण्यासाठी सज्ज आहे रणजित ढाले – पाटील आणि संजीवनी... मालिकेमध्ये गिरजेंकडून रणजितला एक चांगली बातमी मिळते की, तो पुन्हा एकदा पोलिस खात्यात रुजू होऊ शकतो कारण त्याच्यावरचे सगळे आरोप आता मिटले आहेत आणि देशासाठी इतकं चांगलं काम करतो आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे.

 परंतू, रणजित पहिल्यांदा याला नकार देतो. कारण रणजितने लोककल्याणासाठी आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी पुढाकार घेतला असतो. पण, हे सगळे घडत असताना रणजितच्या सभेमध्ये कुसुमावतींचा खून होतो.

आता रणजितला पुढे जाऊन सुगावा लागणार आहे की, यामागे कोणीतरी आहे... आणि ते शोधून काढण्यासाठी रणजित पोलिस खात्यात पुन्हाएकदा रुजू होण्यास तयार होतो.  पण, रणजितने हे करण्यास होकार दिला आहे हे फक्त संजूला माहिती आहे. आता मालिकेमध्ये पुढे काय होणार ? ACP रणजित आणि संजीवनी मिळून कुसुमावती यांच्या खुनाच्या रहस्यापर्यंत पोहचू शकतील ? कसा असेल आता राजा – रानीचा इथून पुढचा प्रवास..

 

Web Title: raja rani chi ga jodi serial Kusumavati's murder at Ranjit's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.