प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची तरल प्रेमकथा रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:18 IST2017-11-21T06:48:21+5:302017-11-21T12:18:21+5:30

आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला ...

Radhe's love for Loved Love story | प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची तरल प्रेमकथा रसिकांच्या भेटीला

प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची तरल प्रेमकथा रसिकांच्या भेटीला

ुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतचं गवसतं तर काहींना हुलकावणी देतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची कथा, “राधा प्रेम रंगी रंगली” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मालिकेत अभिनेत्री कविता लाड मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
 
राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.तर प्रेम व्यवहार चातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. आता हे लग्न त्यांना का करावे लागले ? कुठल्या परिस्थितीत हे लग्न झाले ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.या मालिकेच्या निमित्ताने कविता लाड म्हणाल्या,“ एखादी मालिका निवडताना त्याचे कथानक, भूमिका आणि त्याचबरोबर त्या मालिकेची टीम, दिग्दर्शक, सहकलाकार, निर्माता हे सगळेच महत्वाचे असते.'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेबद्दल बोलायचं झालं तर सगळचं उत्तम जमून आले आहे त्यामुळे मी खूप खुश आणि उत्सुक आहे. मालिकेबद्दल तसेच भूमिकेविषयी बोलताना सचित पाटीलने सांगितले की,“एखादी कलाकृती स्वीकारताना भूमिका आणि कथानक मनाला भावणं अत्यंत महत्वाचं असतं आणि मला राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचे कथानक आणि माझी भूमिका या दोन्ही गोष्टी भावल्या. ज्या पद्धतीची मेहनत संपूर्ण टीम घेत आहे ते पाहता मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.”प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची ही कथा, “राधा प्रेम रंगी रंगली” २४ नोव्हेंबरपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Radhe's love for Loved Love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.