“राधा प्रेम रंगी रंगली”मध्ये राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:39 IST2018-06-07T08:09:11+5:302018-06-07T13:39:11+5:30

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सुरु असलेल्या राधा नक्की जिंवत आहे कि देवयानीने खरोखरच तिला मारून टाकले ...

Radha Prem Rangi Rangali "will introduce Radha in a new identity? | “राधा प्रेम रंगी रंगली”मध्ये राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर ?

“राधा प्रेम रंगी रंगली”मध्ये राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर ?

र्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सुरु असलेल्या राधा नक्की जिंवत आहे कि देवयानीने खरोखरच तिला मारून टाकले आहे ? यावरून प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले होते. शेवटी सत्य प्रेक्षकांसमोर आले. जेव्हा प्रेमा म्हणून मालिकेमध्ये आलेल्या मुलीने राधाच्या वडिलांना म्हणजेच माधव निंबाळकर यांना फोन केला. राधाने त्यावेळेस सगळे गैरसमज दूर केले तसेच गोड बातमीचा खुलासा देखील केला कि प्रेम देशमुख बाबा होणार आहे. राधाने माधव निंबाळकर यांना ती कधीच बंगलोर येथील विपश्यना सेंटरला गेली नसल्याचे सांगितले तसेच ती कुठल्याही कश्यपला देखील ओळखत नाही असे सांगितल्यावर माधव यांना खूप मोठा धक्का बसला. सगळ्यात मोठा धक्का तेंव्हा बसला तेंव्हा राधाने माधव यांच्याकडून वचन घेतले कि, हे सगळे तिच्याबाबतीत झालेले गैरसमज तसेच राहू द्या. आता मालिकेमध्ये राधा इंदौरमध्ये एका इस्पितळामध्ये काम करत असून तिचे नाव प्रेमा असे आहे. मालिकेमध्ये नाडकर्णी कुटुंबाची एन्ट्री झाली असून आनंद नाडकर्णी हे प्रेमा म्हणजेच राधा ज्या इस्पितळामध्ये परिचारिकेचे काम करते आहे त्याचे हे मालक आहेत आणि आता प्रेमा आनंद नाडकर्णी यांच्या वडिलांची देखरेख आणि सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी रहात आहे. आनंद नाडकर्णी यांची भूमिका विक्रम गायकवाड, त्यांच्या बायकोची भूमिका प्राची पिसाट तर वडिलांची भूमिका ऋषिकेश देशपांडे साकारत आहे. या रविवारी म्हणजेच महा रविवार मध्ये मालिकेमध्ये प्रेम आणि आनंद यांची अपघाताने भेट होणार आहे... तेव्हा राधाची नवी ओळख प्रेमला कळणार का ? मालिकेला कुठले नवे वळण मिळणार ?  

प्रेम दीपिका आणि देवयानी यांच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकला असून तो दीपिकाला आता घरी देखील रहाण्यासाठी घेऊन येणार आहे. कारण, देवयानीने त्याला शब्द दिला आहे जर त्याने दिपिकाशी लग्न केले तर प्रेमला त्याचे सगळे वैभव ती परत देईल त्यामुळे आता प्रेम कुठला मार्ग स्वीकारणार ? हे त्याच्यावर अवलंबून आहे ... दीपिका आणि प्रेम कुठल्यातरी कामानिमित्त इंदौरला जाणार असून हे दोघे अपघाताने प्रेमा म्हणजेच राधा आणि आनंद नाडकर्णीच्या समोर येणार आहे. आनंद आणि प्रेमची अपघाताने भेट होणार असून या दोघांमध्ये खडाजंगी देखील होणार आहे.
 

या सगळ्यामध्ये राधा आणि प्रेमची भेट होईल का ? प्रेमसमोर राधाची नवी ओळख येणार का ? प्रेमला कधी कळणार ? सत्य कळल्यावर काय होणार ? मालिकेला कुठले नवे वळण मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

Web Title: Radha Prem Rangi Rangali "will introduce Radha in a new identity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.