हे तर 'लयभारी' नऊवारी साडीत थिरकला अभिनेता, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:10 PM2020-10-09T17:10:05+5:302020-10-09T17:17:38+5:30

विशेष म्हणजे त्याची घायाळ करणारी प्रत्येक अदा, त्याचं रुप, रंगमंचावर बेभान होऊन नाचणं यावर सारा महाराष्ट्राला याड लावणारा हा अभिनेता नेमका कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार.

Pushkar jog to Perform lavani In Laav Re Toh Video | हे तर 'लयभारी' नऊवारी साडीत थिरकला अभिनेता, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

हे तर 'लयभारी' नऊवारी साडीत थिरकला अभिनेता, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील  'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा कार्यक्रम रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच रसिकांनीदेखील या कार्यक्रमाला विशेष पसंती दिली आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओज पाहायला मिळणार आहे. 

या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे प्रेक्षकच नाही तर कलाकारांचा देखील 'लाव रे तो व्हिडिओ' हा आवडता कार्यक्रम ठरतोय आणि म्हणूनच या आठवड्यात प्रेक्षकांना कलाकारांचे मनोरंजक व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत. यामध्ये प्रेक्षकांच्या लाडका अभिनेत्याने मनोरंजन करण्यासाठी खास लावणीवर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. खास या डान्ससाठी त्याने वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. 

विशेष म्हणजे त्याची घायाळ करणारी प्रत्येक अदा, त्याचं रुप,  रंगमंचावर बेभान होऊन नाचणं यावर सारा महाराष्ट्राला याड लावणारा हा अभिनेता नेमका कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार. विशेष म्हणजे स्त्रीवेषात त्याला अजिबात ओळखता येत नाही. हा अभिनेता आहे रसिकांचा लाडका पुष्कर जोग. पुष्कर नेहमीच काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असतो. रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी हटके प्रयोग तो करत असतो. म्हणूनच आज पुष्कर रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे.

अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करु शकेल आणि प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावेल अशा टॅलेंटचा शोध या कार्यक्रमातनं घेतला जातोय. महत्वाचे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.समस्त महाराष्ट्रामधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी या कार्यक्रमामुळे उमेदीच्या कलाकारांना मिळतेय शिवाय वयाची मर्यादा नसल्याने बच्चेकंपनीसह तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकही या कार्यक्रमात आपले व्हिडिओ शुट करुन पाठवू शकतात.

Web Title: Pushkar jog to Perform lavani In Laav Re Toh Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.