​द कपिल शर्माच्या फॅन्सना बसणार हा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 14:32 IST2016-11-01T14:32:46+5:302016-11-01T14:32:46+5:30

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सुनील ग्रोव्हर साकारत असलेला डॉ. मशूर गुलाटी, ...

The push to fit the Kapil Sharma fancy | ​द कपिल शर्माच्या फॅन्सना बसणार हा धक्का

​द कपिल शर्माच्या फॅन्सना बसणार हा धक्का

कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सुनील ग्रोव्हर साकारत असलेला डॉ. मशूर गुलाटी, बम्परची व्यक्तिरेखा साकारणारा किकू शारदा आणि विद्यापतीच्या भूमिकेत असलेली सुगंधा मिश्रा हे कार्यक्रम सोडणार असून त्यांची जागा आता दुसरे कलाकार घेणार आहेत अशी बातमी सध्या मीडियात गाजत आहे. कपिल शर्मा शोमध्ये सुनील ग्रोव्हर आणि किकू शारदा हे तर मुख्य कलाकार आहेत. त्यांच्याशिवाय या कार्यक्रमाचा कोणी विचारही करू शकत नाही. पण या तिघांची जागा आता दुसरे कलाकार घेणार आहेत हे खरे आहे. हे दुसरे कलाकार आणखी कोणीही नसून रॉक ऑन या चित्रपटाची टीम आहे. रॉक ऑन 2 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम द कपिल शर्मा शोवर येणार आहे.
द कपिल शर्मा शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची चांगलीच खिल्ली या टीमचे मंडळी नेहमीच उडवतात. पण आता रॉक ऑनची टीम या कलाकारांची टर खेचणार आहे. अर्जुन रामपाल बम्परची भूमिका साकारणार आहे तर डॉ. मशूरच्या भूमिकेत प्रेक्षकांना फरहान अख्तर पाहायला मिळणार आहे. तर श्रद्धा विद्यापतीच्या भूूमिकेत दिसणार आहे. तर प्राची देसाई या सगळ्यांना साथ देणार आहे. रॉक ऑनच्या टीमने केलेली ही नक्कल पाहिल्यावर कपिल शर्मा शोच्या कलाकारांना त्यांचे हसू आवरणार नाहीये. द कपिल शर्माचा हा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करेल यात काही शंकाच नाही. 

Web Title: The push to fit the Kapil Sharma fancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.