पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘सहाजणी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 15:45 IST2016-09-20T09:28:15+5:302016-09-20T15:45:30+5:30
प्राजक्ता चिटणीस गेली चार दशकं मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर ...

पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘सहाजणी’
गेली चार दशकं मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर लवकरच पुनरागमन करत आहेत. त्यांच्या टूरटूर या मालिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर त्यांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे ग SSS 'सहा'जणी या हटके मालिकेची निर्मिती करणार असून ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवली जाणार आहे. या मालिकेद्वारे सहा नायिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची ही गोष्ट आहे. या सहा जणी प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील यात काही शंका नाही. शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पोर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोडवळकर अशी या मालिकेची तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या अनेक कलाकृती पुरुषोत्तम बेर्डे यांनी याआधी निर्माण केल्या आहेत. निर्मळ विनोद आणि तिरकस विचार ही त्यांची खासियत असल्याने ग SSS 'सहा'जणी काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागली असेल.