लॉकडाऊनदरम्यान या अभिनेत्रीने बनवली पुरणपोळी, शेअर केला खास व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:16 AM2020-04-27T11:16:21+5:302020-04-27T11:21:44+5:30

"यह रिश्ते हैं प्यार के" मधील अभिनेत्री संगीता कापुरे घरी बसून नवीन पदार्थ शिकत आहे, आणि सर्वात आधी तिने पुरण पोळी सारख्या चविष्ट मराठी पदार्थ पासून सुरुवात केली.

 Puranpoli made by this actress Sangeeta Kapure during lockdown, shared a special video | लॉकडाऊनदरम्यान या अभिनेत्रीने बनवली पुरणपोळी, शेअर केला खास व्हिडीओ

लॉकडाऊनदरम्यान या अभिनेत्रीने बनवली पुरणपोळी, शेअर केला खास व्हिडीओ

आज देशामध्ये फार बिकट परिस्थिती आहे, कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीये. सर्वच फार कंटाळलेले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वजण कसोशीने प्रयत्न करत आहोत मात्र धैर्याने काम करण्याची गरज असल्याचे संगीता कपुरेने म्हटले आहे.


कोरोनासारख्या रोगामुळे देश भारत सोशिअल डिस्टंसिन्गचे पालन करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन कलाकारांनाही त्यांच्या घरापुरते मर्यादित केले गेले आहे आणि ते घरकाम, छंद जोपासण्यात आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे कोरोनाव्हायरसविषयी सतत जागरूकता पसरवत आहेत. सेलिब्रिटींनी स्वत: एकटे राहताना काय करत आहेत हे दर्शविण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कथा शेअर केल्या आहेत, तेव्हा आपली लाडकी अभिनेत्री संगीता कपुरे घरीच जेवण बनवत आहेत.

"यह रिश्ते हैं प्यार के" मधील अभिनेत्री संगीता कापुरे घरी बसून नवीन पदार्थ शिकत आहे, आणि सर्वात आधी तिने पुरण पोळी सारख्या चविष्ट मराठी पदार्थ पासून सुरुवात केली.  ज्याचे विडिओ संगीताने आपल्या सोशिअल मीडिया वर शेर केले आहे. सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री संगीता कापुरे स्टार प्लस ची मालिका "येह रिश्ते हैं प्यार के" मध्ये निधी राजवंशाच्या भूमिकात दिसतात, आणि प्रेक्षकांना तिची हि भूमिका खूप आवडते.
 

Web Title:  Puranpoli made by this actress Sangeeta Kapure during lockdown, shared a special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.